यंदाचा एल निनो तीव्र रूप धारण करणार; तो भयंकर आणि खर्चिक ठरण्याची शास्त्रज्ञांना भीती 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
आंतरराष्ट्रीय

यंदाचा एल निनो तीव्र रूप धारण करणार; तो भयंकर आणि खर्चिक ठरण्याची शास्त्रज्ञांना भीती

निसर्गाचा एक अनाकलनीय हवामान घटक असलेला ‘एल निनो’ प्रशांत महासागराच्या वाढलेल्या तापमानामुळे सक्रिय झाला असून, तो ऐतिहासिक पातळीवर तीव्र रूप धारण करण्याची शक्यता आहे, अशी घोषणा हवामानशास्त्रज्ञांनी गुरुवारी केली.

Swapnil S

वॉशिंग्टन : निसर्गाचा एक अनाकलनीय हवामान घटक असलेला ‘एल निनो’ प्रशांत महासागराच्या वाढलेल्या तापमानामुळे सक्रिय झाला असून, तो ऐतिहासिक पातळीवर तीव्र रूप धारण करण्याची शक्यता आहे, अशी घोषणा हवामानशास्त्रज्ञांनी गुरुवारी केली.

हवामानशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, यंदाचा ‘एल निनो’ १९९७ मधील विक्रमी ‘एल निनो’च्या बरोबरीचा किंवा त्यापेक्षाही अधिक तीव्र असू शकतो. १९९७ मध्ये ‘एल निनो’मुळे उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ, चक्रीवादळे आणि वणव्यांमुळे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले होते.

अमेरिकेच्या ‘नॅशनल ओशनिक अँड ॲॅटमॉस्फेरिक ॲॅडमिस्ट्रेशन’ ने अधिकृतपणे ‘एल निनो’च्या अस्तित्वाला दुजोरा दिला आहे. एल निनो म्हणजे विषुववृत्ताजवळ प्रशांत महासागराचे पाणी गरम होणे, ज्यामुळे जगभरातील हवामान चक्रावर परिणाम होतो.

‘नॅशनल ओशनिक अँड ॲॅटमॉस्फेरिक ॲॅडमिस्ट्रेशन’ च्या घोषणेनुसार, या शरद ऋतूच्या उत्तरार्धात आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला हा ‘एल निनो’ इतका तीव्र होण्याची ६३ टक्के शक्यता आहे की, "१९५० पासूनच्या ऐतिहासिक नोंदींनुसार तो आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या एल निनो घटनांपैकी एक ठरेल.’

क्लार्क युनिव्हर्सिटीच्या हवामान शास्त्रज्ञ एबी फ्रेझियर म्हणाल्या की, एल निनोचे उष्ण आणि खोल पाणी पृष्ठभागावर अतिरिक्त उष्णता आणून हवामानाच्या रचनेवर परिणाम करते, ज्यामुळे जगभरातील अनेक भागांमध्ये अत्यंत तीव्र हवामान घटनांना खतपाणी मिळते. प्रशांत महासागरीय क्षेत्रात याची स्थिती ‘खूप लवकर गंभीर होऊ शकते,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘एल निनो’मुळे अटलांटिक महासागरातील हरिकेन हंगामाचा जोर कमी होतो तर प्रशांत महासागरात मात्र हा जोर वाढतो. त्यामुळे अमेरिकेचा पूर्व किनारा आणि गल्फ कोस्टला काहीसा दिलासा मिळत असला, तरी हवाई आणि इतर बेटांवर अधिक धोका निर्माण होतो, असे फ्रेझियर यांनी सांगितले.

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, दुष्काळाचा सामना करत असलेल्या मध्यपूर्वेतील देशांना याचा फायदा होऊ शकतो. दक्षिण अमेरिकेच्या पाश्चात्त्य भागांमध्ये जिथे अनेक दशकांपूर्वी पहिल्यांदा एल निनोचा प्रभाव जाणवला होता, तिथे अनेकदा मुसळधार पाऊस आणि पुरासह प्रचंड उष्ण उन्हाळा अनुभवायला मिळतो.

‘मोबी’ या गुंतवणूक संशोधन संस्थेचे हवामानशास्त्रज्ञ मायकेल फेरारी यांनी सांगितले की, १८ प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये अन्नधान्य आणि बियाणांसाठी, विशेषतः सोयाबीनसाठी परिस्थिती अनुकूल दिसते. परंतु दुग्धव्यवसाय आणि पशुधनाच्या बाबतीत संमिश्र परिणाम दिसून येत आहेत.

भारतात उष्णतेच्या तीव्र लाटा

भारताला अधिक तीव्र उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो, तर दुसरीकडे दुष्काळ, वणवे आणि कडक उन्हाळ्यामुळे ऑस्ट्रेलियाला धोका निर्माण झाला आहे.

Thane : १५ जूनपासून महापालिका शाळांचे शैक्षणिक वर्ष प्रारंभ; प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज व युवा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव

उकाडा, आर्द्रतेमुळे ठाणेकर हैराण; घामोळ्यांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ

Mumbai : पुनर्भरणाची व्यवस्था करा! पावसाच्या पाण्याबाबत BMC आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

पुणे-मिरज रेल्वे मार्गावर २१ दिवसांचा मेगाब्लॉक; दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय