एपस्टीन फाइल्सच्या ईमेलमध्ये मीरा नायर यांचा उल्लेख 
आंतरराष्ट्रीय

एपस्टीन फाइल्सच्या ईमेलमध्ये मीरा नायर यांचा उल्लेख; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींच्या मातोश्रींचे नव्या दस्तावेजातून नाव आले पुढे

‘एपस्टीन फाइल्स’शी संबंधित नवी कागदपत्रे अमेरिकेच्या विधी विभागाने प्रसिद्ध केली आहे. या नव्या कागदपत्रांमध्ये न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्या मातोश्री आणि भारतीय चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शक मीरा नायर यांच्या नावाचा उल्लेख असल्याची बाब पुढे आली आहे.

Swapnil S

न्यू यॉर्क : ‘एपस्टीन फाइल्स’शी संबंधित नवी कागदपत्रे अमेरिकेच्या विधी विभागाने प्रसिद्ध केली आहे. या नव्या कागदपत्रांमध्ये न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्या मातोश्री आणि भारतीय चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शक मीरा नायर यांच्या नावाचा उल्लेख असल्याची बाब पुढे आली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांच्या ताज्या दस्तावेजांमध्ये २००९ सालातला हा ईमेल आढळला आहे. हा ईमेल जैफ्री एपस्टीन या या कोट्यवधींच्या सेक्स गुन्हेगाराशी संबंधित तपासणीच्या अतिरिक्त फाइल्सचा भाग आहे. पब्लिसिस्ट पेगी सीगल यांनी २१ ऑक्टोबर २००९ रोजी जेफ्री एपस्टीनला हा ईमेल पाठवला होता. या ईमेलमध्ये एपस्टीनची जोडीदार व सेक्स तस्कर गिसलेन मॅक्सवेलने न्यूयॉर्कमधील टाऊनहाऊस येथे आयोजित केलेल्या ‘आफ्टर पार्टी’चा उल्लेख केला होता.

नायर यांची प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही

‘पीटीआय’ने नायर यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी संदेश पाठवला, परंतु अद्याप उत्तर मिळालेले नाही. डेप्युटी ॲटर्नी जनरल टॉड ब्लांच यांनी सांगितले की, न्याय विभागाने शुक्रवारी, एप्स्टीन फाइल्स ट्रान्सपरेन्सी ॲक्ट अंतर्गत ३ दशलक्षांहून अधिक अतिरिक्त पृष्ठे प्रसिद्ध केली. याबाबतचा कायदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी मंजूर केला होता. या अतिरिक्त प्रकाशनात २,००० हून अधिक व्हिडीओज आणि १,८०,००० चित्रे समाविष्ट आहेत. या फाइल्स विभागाच्या संकेतस्थळावर पोस्ट करण्यात आल्या आहेत. डिसेंबरमध्ये यापैकी काही नोंदी रोखून धरल्या होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत ५२ लाख कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांचे पुनरावलोकन केले जात आहे. यापूर्वीच्या प्रकाशनासह, एकूण जवळपास ३.५ दशलक्ष पृष्ठे सार्वजनिक झाली आहेत, असे विभागाने सांगितले.

नवीन प्रसिद्ध झालेल्या फाइल्स पाच प्राथमिक स्रोतांमधून गोळा केल्या गेल्या, ज्यात फ्लोरिडा आणि न्यू यॉर्कमधील एप्स्टीन विरोधातील प्रकरणे, मॅक्सवेल विरोधातील न्यू यॉर्क प्रकरण, एप्स्टीनच्या मृत्यूची चौकशी करणारी न्यू यॉर्क प्रकरणे, फ्लोरिडातील माजी बटलरविरोधातील प्रकरण, अनेक ‘एफबीआय’ तपासण्या आणि एप्स्टीनच्या मृत्यूवरील इन्स्पेक्टर जनरलच्या कार्यालयाची चौकशी यांचा समावेश आहे.

‘अमेलिया’च्या पार्टीला क्लिंटन, बेझोस, मीरा नायरही हजर

जेफ्री एपस्टीनची जोडीदार गिसलेन मॅक्सवेल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दोषी ठरली असून ती सध्या कारागृहात आहे. तिला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ‘अमेलिया’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाल्यानंतर एका पार्टीसंदर्भात हा ईमेल होता. ‘अमेलिया’चे दिग्दर्शन नायर यांनी केले आहे. हा चित्रपट अमेरिकेच्या दिग्गज पायलट ॲमेलिया एअरहार्टच्या जीवनावर आधारित आहे, जिने १९३७ मध्ये जगभर फिरण्याचा प्रयत्न करताना पॅसिफिक महासागरात ती गायब झाली होती. या चित्रपटात हिलरी स्वँक आणि रिचर्ड गेअर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सीगल यांनी ईमेलमध्ये लिहिले आहे की, ‘गिसलेन थोड्या वेळापूर्वीच टाऊनहाऊसमधून निघाल्या. बिल क्लिंटन आणि जेफ बेझोसही या पार्टीला होते. दिग्दर्शक मीरा नायर, जीन पिगोजी हेही उपस्थित होते. चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी महिलांना मात्र तो भावला’.

Mumbai : दसरा मेळाव्यासाठी दादरमधील वाहतुकीत मोठे बदल! २० ऑक्टोबरला 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्ग, पार्किंगची व्यवस्था जाणून घ्या

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका

Mumbai : कफ परेड मरिना प्रकल्पाला स्थगिती; MMRDA च्या मंजुरीची एमसीझेडएमएची मागणी

Nagpur : शाळकरी विद्यार्थ्यांचं कृत्य; यूट्यूबवर व्हिडीओ पाहून अल्पवयीन मैत्रिणीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत