भारत-नेदरलँड्समध्ये १७ करारांवर स्वाक्षरी; पंतप्रधान मोदी आणि रॉब जेटेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा  (Photo-X/@narendramodi)
आंतरराष्ट्रीय

भारत-नेदरलँड्समध्ये १७ करारांवर स्वाक्षरी; पंतप्रधान मोदी आणि रॉब जेटेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा

भारत आणि नेदरलँड्समध्ये संरक्षण, महत्त्वपूर्ण खनिजे, सेमीकंडक्टर आणि इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी १७ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

Swapnil S

द हेग : भारत आणि नेदरलँड्समध्ये संरक्षण, महत्त्वपूर्ण खनिजे, सेमीकंडक्टर आणि इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी १७ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटेन यांच्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही देशांमध्ये दोन्ही नेत्यांनी ‘धोरणात्मक भागीदारी आराखडा’ जारी केला आहे.

व्यापार, गुंतवणूक, अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्वांटम कम्प्युटिंग या क्षेत्रांतील सहकार्याचा यात समावेश आहे. संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून उपकरणे आणि यंत्रणांच्या संयुक्त उत्पादनासाठी एक संरक्षण औद्योगिक आराखडा तयार करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे.

या बैठकीत दोन्ही पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील परिस्थिती आणि जागतिक ऊर्जा पुरवठा व व्यापार नेटवर्कवर होणाऱ्या त्याच्या गंभीर परिणामांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून मुक्त दळणवळण आणि जागतिक व्यापाराच्या प्रवाहाचे समर्थन केले आणि कोणत्याही प्रतिबंधात्मक उपायांना विरोध दर्शवला.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स