भारताचे बांगलादेश उच्चायुक्तांना समन्स Photo : X
आंतरराष्ट्रीय

भारताचे बांगलादेश उच्चायुक्तांना समन्स

बांगलादेशची राजधानी ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालयास मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भारताने बुधवारी बांगलादेशचे उच्चायुक्त एम. रियाझ हमीदुल्ला यांना समन्स बजावले. ईशान्येकडील राज्यांना उद्देशून ‘सेव्हन सिस्टर्स’ला वेगळे पाडण्याची धमकी देणाऱ्या एका नेत्याच्या वक्तव्यानंतर अवघ्या एका दिवसात ही कारवाई करण्‍यात आली.

Swapnil S

नवी दिल्ली : बांगलादेशची राजधानी ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालयास मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भारताने बुधवारी बांगलादेशचे उच्चायुक्त एम. रियाझ हमीदुल्ला यांना समन्स बजावले. ईशान्येकडील राज्यांना उद्देशून ‘सेव्हन सिस्टर्स’ला वेगळे पाडण्याची धमकी देणाऱ्या एका नेत्याच्या वक्तव्यानंतर अवघ्या एका दिवसात ही कारवाई करण्‍यात आली. भारताने एम. रियाझ हमीदुल्ला याच्‍याकडे याप्रकरणी तीव्र चिंता व्‍यक्‍त केली आहे.

भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांना एकत्रितपणे ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखले जाते. बांगलादेशातील नॅशनल सिटिझन पार्टीचा (एनसीपी) म्‍होरक्‍या हसनत अब्दुल्ला याने पुन्‍हा एकदा भारताविरोधात गरळ ओकण्‍यास सुरुवात केली आहे. बांगलादेश अस्थिर झाल्यास ईशान्‍य भारतातील सात राज्‍ये (सेव्हन सिस्टर्सला) वेगळी पाडण्याची आणि ईशान्येकडील फुटीरतावाद्यांना आश्रय देण्याची धमकी त्‍याने दिली आहे. आपल्या तीव्र भारतविरोधी वक्तृत्वासाठी ओळखला जाणारा अब्दुल्ला हा विद्यार्थी-नेतृत्वाखालील ‘एनसीपी’चा मुख्य संघटक आहे.

केंद्राकडून गंभीर दखल

भारत आणि बांगलादेशातील मुक्तीयोद्ध्यांनी एकत्र लढलेले युद्ध ६ डिसेंबर १९७१ रोजी ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांच्या शरणागतीने संपले आणि त्यातून बांगलादेशाची निर्मिती झाली होती. भारतात १६ डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा करण्‍यात आला. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या ५४व्या वर्धापनदिनानिमित्त हा दिवस साजरा करण्यात आला. दरम्‍यान, अलीकडेच भारतीय उच्चायोगाला धमकी मिळाल्यानंतर याप्रकरणी भारताने बांगलादेश सरकारकडे औपचारिकरित्या आपली हरकत नोंदवली आहे. ढाक्यातील भारतीय उच्चायोगाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत भारताने आज बांगलादेशचे उच्चायुक्त एम. रियाज हमीदुल्ला यांच्‍याकडे तीव्र चिंता व्‍यक्‍त केली. सरकारने औपचारिकपणे धमकीचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट केलेले नसले, तरी या प्रकाराकडे गंभीर सुरक्षाविषयक बाब म्हणून पाहिले जात आहे.

भारतीय उच्चायुक्तांनाही समन्स

दरम्यान, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्या "प्रक्षोभक विधानांवर" त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. हसीना सध्या भारतात आहेत. देशातील एका विशेष न्यायाधिकरणाने त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. बांगलादेश भारताकडून हसीनाचे प्रत्यार्पण करण्याची मागणी करत आहे.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्रालयाने आज भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावले आणि भारत सरकारला बांगलादेश सरकारची गंभीर चिंता कळवली की, शेख हसीना यांना बांगलादेशात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या समर्थकांना प्रवृत्त करणारी प्रक्षोभक विधाने करण्याची परवानगी दिली जात आहे. त्यांच्या विधानांचा उद्देश बांगलादेशातील आगामी संसदीय निवडणुकीत अडथळा आणणे आहे.

Mumbai : नालेसफाईचे काम अनुभव नसलेल्या कंत्राटदारांनाही; नालेसफाई रखडल्यामुळे महापौरांचा अजब निर्णय

राज्यात गॅस, इंधनाचा पुरेसा साठा आहे; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे भुजबळांचे आवाहन

Mumbai : महापौरांचा VIP थाट कायम! मोटारीवर लखलखणार दिवे

२४ अनधिकृत नर्सिंग होम्सवर कारवाईचा बडगा; जन्म नोंदणी फॉर्म देणे बंद; बनावट प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर BMC चा कठोर पवित्रा

BMC सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करा! ठाकरे सेनेच्या अंकित प्रभू यांची सूचना