अमेरिकन लष्करी तळावर इराणचे हल्ले; ४ हजार किलोमीटर दूरवरून क्षेपणास्त्रे डागली 
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War : अमेरिकन लष्करी तळावर इराणचे हल्ले; ४ हजार किलोमीटर दूरवरून क्षेपणास्त्रे डागली

इराणने शनिवारी हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटन संयुक्त लष्करी तळ असलेल्या डिएगो गार्सियावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली.

Swapnil S

दुबई : इराणने शनिवारी हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटन संयुक्त लष्करी तळ असलेल्या डिएगो गार्सियावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. एका वृत्तवाहिनीनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. इराणने दोन क्षेपणास्त्रे डागली, परंतु त्यापैकी एकही तळावर आदळले नाही. हा तळ इराणच्या किनारपट्टीपासून सुमारे ३८१० किलोमीटर आणि तेहरानपासून ५ हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. डिएगो गार्सिया हा अमेरिकेसाठी एक महत्त्वाचा लष्करी तळ आहे. या तळावरून अमेरिका आपली बॉम्बर विमाने चालवते. येथून मोठी टँकर विमाने (केसी-१३५) आणि टेळहणी विमानेही कार्यरत राहू शकतात.

इराणच्या नतांज अणु केंद्रावर हल्ला !

तेहरान : अमेरिका आणि इस्त्रायलने हवाई हल्ला चढवत शनिवारी इराणच्या नतांज अणु केंद्र प्रकल्पाला लक्ष्य केले. मात्र, कोणतीही किरणोत्सर्गी गळती (रेडिओअॅक्टिव्ह गळती) झालेली नाही आणि प्रकल्पाच्या आसपास राहणाऱ्या लोकांना कोणताही धोका नाही, अशी माहिती समोर आली आहे.

तसनीम न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात संस्थेने म्हटले आहे, अमेरिका आणि इस्त्रायली शासनाने शनिवारी सकाळी नतांज एनरिचमेंट कॉम्प्लेक्सला लक्ष्य केले. मध्य इराणमधील या भागात "रेडिओऍक्टिव (धोकादायक अणु) गळती झाल्याची कोणतीही माहिती नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील लष्करी कारवाया "मागे घेण्याचा" विचार करत असल्याचे सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेने या प्रदेशात आणखी तीन हल्ला करणारी जहाजे आणि सुमारे २,५०० अतिरिक्त मरीन सैनिक पाठविल्याचे वृत्त आहे.

तेहरानच्या आग्नेयेला सुमारे २२० किलोमीटर (१३५ मैल) अंतरावर असलेला नतांज प्रकल्प, जून २०२५ मध्ये इस्त्रायल आणि इराण यांच्यात झालेल्या १२ दिवसांच्या युद्धातील मुख्य लक्ष्यांपैकी एक होता, ज्यात नंतर अमेरिकाही सामील झाली होती, आणि सध्याच्या संघर्षादरम्यानही तो लक्ष्य करण्यात आला आहे.

युद्धाच्या पहिल्या आठवड्यात इराणच्या मुख्य युरेनियम संवर्धन केंद्र, नतांजवरही हल्ला झाला होता आणि उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे दिसून आले. संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा देखरेख संस्थेने म्हटले आहे की, त्या पहिल्या हल्ल्यातून कोणतेही किरणोत्सर्गी परिणाम अपेक्षित नाहीत.

ऐन दिवाळीत मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडणार! मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील लोकल रद्द, वाचा महत्त्वाचे अपडेट्स

Maharashtra Board Exam 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर! कोणता पेपर कधी? जाणून घ्या एका क्लिकवर

Mumbai : दरवाजात उभं राहण्यावरून वाद अन् हाणामारी! चर्चगेट-विरार लोकलमधून प्रवासी थेट फलाटावर पडला, Video

Mumbai : धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पाचे ७६ टक्के काम पूर्ण; मे २०२७ पर्यंत उभारणीचे लक्ष्य

पत्नी अन् दोन मुलं असतानाही मित्राच्या मुलीला लग्नाची मागणी; २० वर्षीय तरुणीनं नकार देताच उचललं टोकाचं पाऊल