छायाचित्र : Facebook
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War : अमेरिकेचा प्रस्ताव इराणने फेटाळला

अमेरिकेने इराणसमोर युद्धविरामासाठी १५ कलमी प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती पाकिस्तानच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली आहे. मात्र, इराणने अमेरिकेशी थेट वाटाघाटी करण्याची शक्यता फेटाळून लावत हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

Swapnil S

इस्लामाबाद : अमेरिकेने इराणसमोर युद्धविरामासाठी १५ कलमी प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती पाकिस्तानच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली आहे. मात्र, इराणने अमेरिकेशी थेट वाटाघाटी करण्याची शक्यता फेटाळून लावत हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

इराणवरचे आर्थिक निर्बंध शिथिल करावेत, नागरी अणुऊर्जा प्रकल्पांसाठी सहकार्य करावेत, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग सुनिश्चित करावा इत्यादी मुद्द्यांचा या प्रस्तावामध्ये समावेश आहे. इराणने या प्रकरणावर सावध पवित्रा घेतला आहे. आपण अमेरिकेशी कोणत्याही प्रकारची चर्चा करत नसल्याचा दावा इराणने केला आहे. इतकेच नव्हे तर, इराणच्या लष्करी प्रवक्त्याने अमेरिकेच्या या राजनैतिक प्रयत्नांची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, वॉशिंग्टनने एका बाजूला हा शांतता प्रस्ताव पाठवला असला, तरी दुसऱ्या बाजूला मध्यपूर्वेतील आपल्या सैन्याची कुमक वाढवण्यास सुरुवात केली आहे. आधीच तैनात असलेल्या मरीन कमांडोजच्या मदतीसाठी आता अमेरिकेने आपले 'पॅराट्रूपर्स' (छत्रीधारी सैनिक) युद्धभूमीवर पाठवण्यास सुरुवात केली आहे.

पाकचे जहाज रोखले

इराणी सैन्याने पाकिस्तानकडे जाणाऱ्या एका कंटेनर जहाजाला होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्यापासून रोखल्याची माहिती समोर आली आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) नुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या शारजा बंदरातून कराचीकडे निघालेल्या ‘सेलेन’ नावाच्या या जहाजाला, वाहतुकीच्या परवानगीअभावी परत फिरावे लागले आहे.

इराणचे प्रत्युत्तर

अमेरिकेच्या राजनैतिक प्रयत्नांची थट्टा उडवत इराणच्या लष्कराने बुधवारी इस्रायल आणि पर्शियन आखाती देशांवर हल्ल्यांचा धडाका लावला. इराणने केलेल्या ताज्या हल्ल्यामुळे कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग लागली.

ओमानजवळ व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नौदलाला इमर्जन्सी कॉल अन् MRCC च्या तत्परतेमुळे २४ भारतीय खलाशांची सुटका

Mumbai : दुसरी लाईफलाइन ठरतेय ‘काळ’...वर्षभरात ‘बेस्ट’च्या धडकेत ३२ जणांचा मृत्यू

साखरपुड्याच्या आनंदावर विरजण! जळगावात कार-एसटी-दुचाकीचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा अंत, दुचाकीस्वारही ठार

मे महिन्यात ईव्ही विक्रीचा नवा विक्रम; देशात विजेवरील वाहनांच्या लोकप्रियतेत वाढ

Dadar BEST Bus Accident : घरात लग्नाची तयारी, बहिणीच्या संसाराचीही स्वप्नं; पण क्षणात सर्व संपलं, २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू