इस्लामाबाद : १४ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू  PTI
आंतरराष्ट्रीय

इस्लामाबाद : १४ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

इस्लामाबाद येथील ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयात बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत किमान १४ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Swapnil S

इस्लामाबाद : इस्लामाबाद येथील ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयात बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत किमान १४ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग सकाळी ७ वाजेच्या सुमारास ‘मदर अँड चाइल्ड’ वॉर्डमध्ये लागली. वॉर्डमध्ये एकूण १५ बालके होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ६ गाड्या आणि ४ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी मदतकार्य सुरू केले.

रुग्णालयाच्या प्रवक्त्या डॉ. अनिला जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका डॉक्टरने तत्परता दाखवत एका बालकाचा जीव वाचवला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वॉर्डमध्ये ऑक्सिजनच्या पाइपलाइन असल्यामुळे आगीचा भडका उडाला आणि ती वेगाने पसरली, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री तारीक फझल चौधरी यांनी दिली.

काही बालकांचे मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाल्याने डीएनए चाचणीसाठी पालकांचे नमुने घेतले जात आहेत. आगीची माहिती मिळताच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ आणि अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी शोक व्यक्त केला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nepal Floods : पुरात वाहून आलेल्या मृतदेहालाही सोडलं नाही! दागिन्यांवर डल्ला, VIDEO व्हायरल होताच दोघांना बेड्या

मानखुर्द येथील शाळांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फौजदारी कारवाईला तात्पुरती स्थगिती

Mumbai : पालिका शाळांमध्ये निकृष्ट मध्यान्ह भोजन; विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका, कारवाई करा

...तरच कोकण रेल्वेचे विलीनीकरण; राज्यांनी हिस्सा सोडल्यानंतर भारतीय रेल्वेसोबत एकत्रीकरण शक्य, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

Mumbai Metro 7A : आराखड्यातील चुकीमुळे २६० कोटींचा फटका; सल्लागाराच्या निष्काळजीपणावरून MMRDA वर टीका