'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने उद्ध्वस्त केलेले 'जैश-ए-मोहम्मद'चे मुख्यालय पुन्हा उभे 
आंतरराष्ट्रीय

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने उद्ध्वस्त केलेले 'जैश-ए-मोहम्मद'चे मुख्यालय पुन्हा उभे

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भुईसपाट झालेल्या या तळाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, ते पुन्हा एकदा वापरण्यासाठी तयार झाल्याचे चित्र आहे.

Swapnil S

लाहोर : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान उद्ध्वस्त करण्यात आलेले ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय पाकिस्तानात पुन्हा उभे राहिले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे असलेले जैश-ए-मोहम्मदचे मुख्य मुख्यालय व प्रशिक्षण तळ पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याचे सॅटेलाइट छायाचित्रांमधून समोर आले आहे.

भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भुईसपाट झालेल्या या तळाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, ते पुन्हा एकदा वापरण्यासाठी तयार झाल्याचे चित्र आहे. बहावलपूर येथील एन-५ राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेले हे संकुल ‘जामिया सुभान अल्लाह’ म्हणूनही ओळखले जाते. हा परिसर बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा मुख्य बालेकिल्ला आणि रणनीतिक केंद्र मानला जातो. येथूनच भारतावर होणाऱ्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे प्लॅनिंग आणि दहशतवाद्यांना शस्त्र प्रशिक्षण दिले जात असे.

मे २०२६ मध्ये अमेरिकन स्पेस तंत्रज्ञान कंपनी ‘व्हँटोर’ने जारी केलेल्या उच्च-रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमांमध्ये या संकुलात अवजड यंत्रसामग्री, क्रेन आणि बांधकाम वाहने सक्रिय असल्याचे दिसून आले होते. या छायाचित्रांवरून मशिदीच्या छतांची आणि उद्ध्वस्त झालेल्या घुमटांची दुरुस्ती सुरू असल्याचे प्राथमिक संकेत मिळाले होते.

आता ऑगस्ट २०२६ मध्ये समोर आलेल्या ताज्या उपग्रह अहवालानुसार आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण विश्लेषकांच्या मते, या संकुलाचे पुनर्रचना काम पूर्ण झाले आहे. इमारतीच्या मध्यवर्ती सभागृहाचे प्लास्टरिंग, रंगकाम, आणि संगमरवरी फरशी बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, उद्ध्वस्त झालेले सर्व घुमट पुन्हा पूर्ववत करण्यात आले आहेत. मे २०२५ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पूर्णपणे बंद पडलेला हा भाग १५ महिन्यांच्या कालावधीत पाकिस्तान प्रशासनाच्या आणि आयएसआयच्या मदतीने पुन्हा उभा करण्यात आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स