ब्रेकअपचा विकृत सूड! प्रेयसीच्या नावाने बनावट Tinder प्रोफाईल तयार करून अनोळखी पुरुषांना घरात पाठवलं 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
आंतरराष्ट्रीय

ब्रेकअपचा विकृत सूड! प्रेयसीच्या नावाने बनावट Tinder प्रोफाईल तयार करून अनोळखी पुरुषांना घरात पाठवलं

ग्रेटर मँचेस्टरमध्ये ब्रेकअपनंतर एका व्यक्तीने एक्स गर्लफ्रेंडच्या नावाने बनावट Tinder प्रोफाईल तयार करून अनोळखी पुरुषांना तिच्या घराकडे पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

Mayuri Gawade

ऑनलाईन डेटिंग आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असताना त्याचा गैरवापर किती भयानक स्वरूप धारण करू शकतो, याचं धक्कादायक उदाहरण इंग्लंडमधील ग्रेटर मँचेस्टर येथे समोर आलं आहे. ब्रेकअपनंतर संतप्त झालेल्या एका ३६ वर्षीय व्यक्तीने आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या नावाने बनावट Tinder प्रोफाईल तयार करून अनोळखी पुरुषांना तिच्या घराकडे पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणात असद हुसेन असे आरोपीचे नाव असून, चेस्टर क्राउन कोर्टाने त्याला स्टॉकिंगसह विविध आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे. जून महिन्यात त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.

प्रेमसंबंधातून सुरू झाला त्रास

समोर आलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ मध्ये असद हुसेनने 'मिक रेनी' या बनावट नावाने संबंधित महिलेशी संपर्क साधला होता. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र, काही काळातच हुसेनचं वागणं संशयी आणि नियंत्रण ठेवणारं बनल्याने दोघांमध्ये वाद होऊन ब्रेकअप झाले. त्यानंतरही त्याने महिलेच्या मित्र-मैत्रिणी आणि मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

बनावट Tinder प्रोफाईलचा सैतानी प्लॅन

ब्रेकअपनंतर संतप्त झालेल्या हुसेनने महिलेच्या नावाने Tinder वर बनावट प्रोफाईल तयार केले. या प्रोफाईलमध्ये अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंसक स्वरूपाचे मजकूर लिहिण्यात आले होते. संबंधित महिलेला बलात्कार विषयक फॅन्टसी असल्याचा खोटा दावा या प्रोफाईलमध्ये करण्यात आला होता. इतकंच नाही, तर "ती नाही म्हणत असेल तरी तिला तेच हवं आहे," अशा प्रकारचे धक्कादायक संदेश अनोळखी पुरुषांना पाठवण्यात येत होते.

या संदेशांना बळी पडून तब्बल १८ पुरुष संबंधित महिलेच्या घरापर्यंत पोहोचल्याचं तपासात समोर आलं. एका व्यक्तीने घराचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचाही प्रयत्न केला. तर दुसऱ्या एका घटनेत महिला घरात नसताना एक अनोळखी व्यक्ती थेट घरात शिरला होता.

CCTV आणि कारमुळे पोलिसांना मिळाला सुगावा

सुरुवातीला 'मिक रेनी' नावाच्या व्यक्तीचा शोध घेताना पोलिसांची दिशाभूल झाली. मात्र, पीडितेच्या घराबाहेरील डोअरबेल कॅमेऱ्यात दिसलेल्या ऑडी R8 कारमुळे तपासाला दिशा मिळाली.

ही कार असद हुसेनच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे निष्पन्न झाले. तपासात असेही समोर आले की, तो महिलेच्या घराजवळ गाडी उभी करून तासनतास बनावट Tinder प्रोफाईल हाताळत होता.

ओळख लपवण्यासाठी त्याने मोबाईल फोन नष्ट करणे, गॅजेट्स रीसेट करणे यांसारखे प्रयत्न केले. मात्र, तांत्रिक पुरावे आणि वाहनाच्या आधारे पोलिसांनी त्याच्याविरोधातील आरोप सिद्ध केले.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके