अमेरिकेचा उद्दामपणा कायम; होर्मुझमध्ये नाकेबंदी स्वीकारावीच लागेल - रुबियो 
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचा उद्दामपणा कायम; होर्मुझमध्ये नाकेबंदी स्वीकारावीच लागेल - मार्को रुबियो

अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात ३ भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबाबत भारतात असंतोष खदखदत आहे. याबाबत भारताने अमेरिकेकडे आपला निषेध नोंदवला.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात ३ भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबाबत भारतात असंतोष खदखदत आहे. याबाबत भारताने अमेरिकेकडे आपला निषेध नोंदवला. पण, अमेरिकेने आपला उद्दामपणा कायम ठेवला आहे. इराणच्या तेलाची अवैध वाहतूक आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अमेरिकन नाकेबंदीचे कोणतेही उल्लंघन सहन केले जाणार नाही, असा कडक इशारा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी होर्मुझमध्ये दिला आहे.

भारतीय जहाजांवर केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. यावरून देशात संतापाची लाट उसळली. भारतातर्फे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांच्याशी फोनवरून संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर रुबियो यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितले की, हॉरमुझच्या सामुद्रधुनीमध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी अमेरिकन सैन्याकडून दिल्या जाणाऱ्या आदेशांचे सर्व व्यापारी जहाजांनी त्वरित पालन करावे, यावर रुबियो यांनी जोर दिला आहे. या भागात अमेरिकन नाकेबंदीचे उल्लंघन आणि इराणच्या तेलाची अवैध वाहतूक खपवून घेतली जाणार नाही, असे रुबियो यांनी स्पष्ट केल्याचे पिगॉट यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

शांतता करार आज नाही: इराणचे स्पष्टीकरण

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक शांतता करार पुढील २४ तासांत अंतिम होण्याची दाट शक्यता आहे, असा मोठा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी केला आहे. मात्र, शांतता करारावर रविवारी स्वाक्षरी होणार नाही, असे स्पष्टीकरण इराणने दिले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले की, प्रस्तावित 'इस्लामाबाद करारावर स्वाक्षरीच्या तारखेबद्दल भाष्य करताना तेहरान सध्या सावध भूमिका घेत आहे. यासाठी त्यांनी पाकिस्तानकडून होणारी दिरंगाई कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका

Mumbai : दसरा मेळाव्यासाठी दादरमधील वाहतुकीत मोठे बदल! २० ऑक्टोबरला 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्ग, पार्किंगची व्यवस्था जाणून घ्या

Mumbai : आता हापूस आंबे, काजू वर्षभर उपलब्ध होणार; २ हजार टन क्षमतेच्या शीतगृहाची निर्मिती

नाशिक जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीसह विक्रीवर बंदी; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश

मीरा-भाईंदरमध्ये बसभाड्याचा झटका! साध्या बसच्या भाड्यात वाढ; एसी बस स्वस्त