मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचा विरोध संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचा विरोध

न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील प्रस्तावित कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. भागवत हे या आठवड्याच्या शेवटी अमेरिकेतील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत.

Swapnil S

न्यूयॉर्क : न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील प्रस्तावित कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. भागवत हे या आठवड्याच्या शेवटी अमेरिकेतील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. मात्र, हा एक "खासगी" कार्यक्रम असल्याने तो रद्द करण्याचे अधिकार न्यू यॉर्क शहर प्रशासनाच्या अखत्यारीत आहेत की नाही, याबद्दल ममदानी यांनी शंका व्यक्त केली आहे.

मोहन भागवत हे मंगळवारी अमेरिकेत दाखल झाले असून, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जागतिक संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून ते या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनचा समावेश आहे. अमेरिकेत २९ ऑगस्ट रोजी मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे सुमारे ५,००० लोकांच्या सभेला ते संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला काही नागरी हक्क संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : दसरा मेळाव्यासाठी दादरमधील वाहतुकीत मोठे बदल! २० ऑक्टोबरला 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्ग, पार्किंगची व्यवस्था जाणून घ्या

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका

Mumbai : कफ परेड मरिना प्रकल्पाला स्थगिती; MMRDA च्या मंजुरीची एमसीझेडएमएची मागणी

Nagpur : शाळकरी विद्यार्थ्यांचं कृत्य; यूट्यूबवर व्हिडीओ पाहून अल्पवयीन मैत्रिणीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत