उत्तर कोरियाचा पुन्हा क्षेपणास्त्र मारा; द.कोरियाच्या मैत्रीपूर्ण प्रस्तावांची उडवली थट्टा प्रातिनिधिक छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

उत्तर कोरियाचा पुन्हा क्षेपणास्त्र मारा; द.कोरियाच्या मैत्रीपूर्ण प्रस्तावांची उडवली थट्टा

दक्षिण कोरियासोबतचे संबंध सुधारण्यास उत्तर कोरियाने स्पष्ट नकार दिला असून, गेल्या २४ तासांत दुसऱ्यांदा क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. बुधवारी उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनारपट्टीवरून समुद्राच्या दिशेने अनेक 'शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक' क्षेपणास्त्रांचा मारा केला.

Swapnil S

सोल : दक्षिण कोरियासोबतचे संबंध सुधारण्यास उत्तर कोरियाने स्पष्ट नकार दिला असून, गेल्या २४ तासांत दुसऱ्यांदा क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. बुधवारी उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनारपट्टीवरून समुद्राच्या दिशेने अनेक 'शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक' क्षेपणास्त्रांचा मारा केला. दक्षिण कोरियाने चर्चेची आशा व्यक्त केल्यानंतर काही तासांतच प्योंगयांगने ही आक्रमक कृती केली आहे. २४० किमीचा पल्ला आणि सलग चाचण्या दक्षिण कोरियाच्या 'जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ'ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या 'वॉन्सन' भागातून ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या क्षेपणास्त्रांनी साधारण २४० किलोमीटरचे अंतर कापले आणि ती समुद्रात कोसळली. याशिवाय, मंगळवारी देखील उत्तर कोरियाने राजधानी क्षेत्रातून एका अज्ञात उपकरणाचे प्रक्षेपण केले होते, परंतु दक्षिण कोरियाच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ते प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी ठरले असावे.

अण्वस्त्र सज्जतेवर भर

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी नुकतीच एका नवीन 'सॉलिड-फ्युएल' इंजिनच्या चाचणीचे निरीक्षण केले. तज्ज्ञांच्या मते, हे तंत्रज्ञान उत्तर कोरियाला अधिक शक्तिशाली आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे बनवण्यास मदत करेल. 'सॉलिड-फ्युएल' क्षेपणास्त्रे लपवून ठेवणे सोपे असते, ज्यामुळे शत्रू राष्ट्रांना सावध होण्याची संधी मिळत नाही.

आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

BEST ला जाहिरातींचा आधार; दोन वर्षांत ११४.१३ कोटींचा महसूल जमा

Mumbai : हरित क्षेत्रातील सुविधांसाठी मोजा पैसे! कोस्टल रोड प्रकल्पातील ७० हेक्टर हरितक्षेत्र रिलायन्स फाऊंडेशन विकसित करणार

एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ; चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी