फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टरचा भूकंप; १९ जणांचा मृत्यू 
आंतरराष्ट्रीय

फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टरचा भूकंप; १९ जणांचा मृत्यू

दक्षिण फिलिपिन्सला सोमवारी सकाळी ७.८ रिश्टर स्केल अशा एका अत्यंत शक्तिशाली भूकंपाचा हादरा बसला.

Swapnil S

मनिला : दक्षिण फिलिपिन्सला सोमवारी सकाळी ७.८ रिश्टर स्केल अशा एका अत्यंत शक्तिशाली भूकंपाचा हादरा बसला. या भीषण आपत्तीत आतापर्यंत किमान १९ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक जखमी झाले आहेत. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, समुद्रकिनाऱ्यावर १ मीटर (३ फूट) उंचीच्या लाटा धडकल्या आहेत.

भूकंपाचा केंद्रबिंदू मिंदानाओ बेटाजवळील समुद्रात ३३ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाचा सर्वाधिक फटका जनरल सँटोस या ७ लाख लोकसंख्या असलेल्या बंदर शहराला बसला आहे.

तेथील आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले असून १७ देशांतर्गत विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

त्सुनामीचा इशारा

भूकंपानंतर समुद्रात १ ते १.४ मीटर उंचीच्या त्सुनामीच्या लाटांची नोंद झाली. सुलतान कुदरात आणि सारंगानी प्रांतात त्सुनामीचा सर्वाधिक प्रभाव जाणवला. इंडोनेशिया, पलाऊ आणि अगदी दक्षिण जपानपर्यंत त्सुनामीच्या लहान लाटांची नोंद झाली आहे. मलेशियाच्या सबाह प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले. फिलिपिन्स हा देश प्रशांत महासागरातील 'रिंग ऑफ फायर' (भूकंपप्रवण क्षेत्र) वर स्थित असल्यामुळे येथे वारंवार शक्तिशाली भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात.

सणासुदीत पारंपरिक पेहरावाची क्रेझ; पंजाबी सूट, अनारकली अन् एथनिक गाऊन ठरतोय हिट

अंबानींच्या गणेशोत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी; आलिया-रणबीर, कियारा-सिद्धार्थसह स्टार कपल्सच्या फॅशनची चर्चा

गणेशोत्सवासाठी जिनिलीयाचा मराठमोळा लूक; साडीपासून दागिन्यांपर्यंत सगळंच सुंदर, एकदा फोटो पाहाच

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार