पाकिस्तानमध्ये भीषण रस्ते अपघात; १७ प्रवाशांचा मृत्यू, ५ जखमी (Photo - X)
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानमध्ये भीषण रस्ते अपघात; १७ प्रवाशांचा मृत्यू, ५ जखमी

पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात सोमवारी एका भरधाव वेगात असलेल्या प्रवासी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या बसला जोराची धडक दिली.

Swapnil S

पेशावर : पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात सोमवारी एका भरधाव वेगात असलेल्या प्रवासी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या बसला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात किमान १७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा अपघात मर्दान जिल्ह्यातील 'स्वात एक्स्प्रेस-वे'वर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसमध्ये काही तांत्रिक बिघाड (जनरेटरमध्ये बिघाड) झाला होता.

त्यामुळे चालकाने बस रस्त्याशेजारी थांबवली होती. याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव प्रवासी बसने या उभ्या असलेल्या बसला मागून जोरदार धडक दिली.

अपघातातील सर्व बळी हे अप्पर दिर आणि बाजावर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

CJP Protest : जंतर-मंतरवर प्रवेश करताच दिल्ली पोलिसांची कारवाई; सौरव दास, आशुतोष रांकांसह अजिंक्य शिंदे ताब्यात

Thane : नवरात्रोत्सवात कमळाचा भास, वॉटर लिलीचा बाजार; देवीच्या मंदिरांबाहेर जलकमळाची रेलचेल

सिंधुदुर्गाची भूजलपातळी खालावली; मालवणमध्ये स्थिती ‘अतिगंभीर’, कणकवली, वेंगुर्ले आणि देवगडमध्ये मध्यम स्वरूपाची घट

Mumbai : शाळेच्या मैदानावर खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, फुटबॉलच्या सुविधा; महापालिका २ कोटी ७१ लाख रुपये खर्च करणार

Mumbai : ‘पत्नी, मुलींसाठी दरमहा पोटगी योग्यच’; उच्च न्यायालयाचा निर्णय