वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ‘जशास तसे’ करामुळे जगभरात चिंता वाढली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला काही दिवसांसाठी मुदतवाढ दिली आहे. ट्रम्प यांनी २ एप्रिलला घोषित केलेले ‘जशास तशा’ कराची मुदतवाढ १ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. या निर्णयाबाबत निर्यातदारांनी सांगितले की, ‘जशास तसा’ कराची मुदतवाढ वाढवल्याने अमेरिका आपल्या व्यापारी संबंध असलेल्या देशांशी चांगले संबंध ठेवू इच्छितो.
भारतीय निर्यात संघटन महासंघाचे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, ‘जशास तसा’ कराला मुदतवाढ दिल्याने व्यापारी चर्चेसाठी संधी निर्माण करत आहे. भारताला आपल्या उर्वरित मुद्दे सोडवण्यासाठी वेळ मिळेल. भारताने या महिना अखेरपर्यंत अमेरिकेसोबत कमीत कमी वस्तूंवर द्विपक्षीय करार केला तर भारताला अन्य देशांच्या तुलनेत अधिक फायदा मिळू शकतो.
एका निर्यातदाराने सांगितले की, या निर्णयामुळे देशातील उद्योगांना दिलासा मिळणार आहे. भारताला अंतरिम व्यापार करारासाठी अमेरिकेसोबत चर्चा करायला आणखी १२ ते १३ दिवसांचा कालावधी मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ज्ञ विश्वजीत धर म्हणाले की, भारतासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. भारताने काही मुद्द्यांवर कठोर भूमिका घेतली आहे. ‘फियो’चे अध्यक्ष आणि लुधियाना येथील इंजिनिअरिंग निर्यातदाराने सांगितले की, हा अत्यंत छोटासा दिलासा आहे. पण, आम्हाला दिलासा मिळेल असे वाटते.
१४ देशांवर नवीन कर जाहीर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १४ देशांवर नवीन कर दर जाहीर केले आहेत, ज्यामध्ये २५ ते ४० टक्के पर्यंत कर आकारले आहेत. मलेशिया: २५ टक्के, ट्युनिशिया: २५ टक्के, कझाकस्तान: २५ टक्के, दक्षिण आफ्रिका: ३० टक्के, लाओस: ४० टक्के, म्यानमार: ४० टक्के, कंबोडिया: ३६ टक्के, थायलंड: ३६ टक्के, सर्बिया: ३५ टक्के, बांगलादेश: ३५ टक्के, इंडोनेशिया: ३२ टक्के, बोस्निया आणि हर्जेगोविना: ३० टक्के, जपान: २५ टक्के, दक्षिण कोरिया: २५ टक्के
भारताला नवीन बाजारपेठा धुंडाळणे गरजेचे
मुंबईचे निर्यातदार व टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीजचे (इंडिया) संस्थापक शरद कुमार सराफ म्हणाले की, अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे बेभरवाशाचे आहेत. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना आता नवीन बाजारपेठा धुंडाळणे गरजेचे आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकारांना सांगितले की, ट्रम्प या विलंबाला औपचारिकता देण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करतील, तसेच अद्ययावत शुल्कांची रूपरेषा देणारे परदेशी नेत्यांशी अतिरिक्त पत्रव्यवहार ‘पुढील महिन्याच्या आत’ केला जाईल.
भारत-अमेरिका व्यापार संबंध
भारत आणि अमेरिका यंदा सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान एक व्यापक द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू इच्छितात. तत्पूर्वी हंगामी कराराला ते अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत. २०२१-२२ पासून अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिलेला आहे. २०२४-२५ मध्ये भारत-अमेरिके दरम्यान वस्तूंचा व्यापार १३१.८४ अब्ज डॉलर होता. त्यात भारताची निर्यात ८६.५१ अब्ज डॉलर, तर आयात ४५.३३ अब्ज डॉलर होती. भारताचा व्यापार ४१.१८ अब्ज डॉलर सरप्लस होता.
१४ देशांवर नवीन कर जाहीर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १४ देशांवर नवीन कर दर जाहीर केले आहेत, ज्यामध्ये २५ ते ४० टक्के पर्यंत कर आकारले आहेत. मलेशिया: २५ टक्के, ट्युनिशिया: २५ टक्के, कझाकस्तान: २५ टक्के, दक्षिण आफ्रिका: ३० टक्के, लाओस: ४० टक्के, म्यानमार: ४० टक्के, कंबोडिया: ३६ टक्के, थायलंड: ३६ टक्के, सर्बिया: ३५ टक्के, बांगलादेश: ३५ टक्के, इंडोनेशिया: ३२ टक्के, बोस्निया आणि हर्जेगोविना: ३० टक्के, जपान: २५ टक्के, दक्षिण कोरिया: २५ टक्के