इराणसोबतच्या कराराबाबत ट्रम्प संभ्रमात; अद्याप कोणताही अंतिम निर्णय नाही 
आंतरराष्ट्रीय

इराणसोबतच्या कराराबाबत ट्रम्प संभ्रमात; अद्याप कोणताही अंतिम निर्णय नाही

इराणसोबतचा युद्धविराम वाढवणे आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेली 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा खुली करण्याच्या कराराबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसच्या सिच्युएशन रूममध्ये आपल्या सल्लागारांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.

Swapnil S

वाशिंग्टन : इराणसोबतचा युद्धविराम वाढवणे आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेली 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा खुली करण्याच्या कराराबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसच्या सिच्युएशन रूममध्ये आपल्या सल्लागारांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. मात्र, या करारावर पुढे जावे की नाही, याबाबत ट्रम्प यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे, इराणनेही या कराराला अद्याप अंतिम रूप देण्यात आलेले नाही, असे म्हटले आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी यांनी आपण "अंतिम निर्णय" घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले होते. मात्र, राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत झालेली ही सुमारे दोन तासांची बैठक कोणत्याही निर्णयाविना संपल्याचे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. अमेरिकेच्या अटींचे पूर्ण पालन करणाऱ्या आणि इराणच्या अणू महत्त्वाकांक्षांना आळा घालणाऱ्या करारावरच ट्रम्प स्वाक्षरी करतील, असे या अधिकार्याने स्पष्ट केले.

इराणचे मुख्य वार्ताहर मोहम्मद बगेर कलिबाफ यांनी एक्सवर लिहिले की, आम्हाला कोणत्याही आश्वासनांवर किंवा शब्दांवर विश्वास नाही, तर फक्त कृतीवर विश्वास आहे. गेल्या वर्षभरात अणू चर्चेदरम्यान अमेरिका आणि इस्रायलने इराणवर दोनदा हल्ले केल्यामुळे दोन्ही देशांमधील अविश्वास कमालीचा वाढला आहे.

"दुसऱ्या बाजूने कृती केल्याशिवाय आम्ही कोणतेही पाऊल उचलणार नाही. आम्ही चर्चेतून नव्हे, तर क्षेपणास्त्रांच्या जोरावर सवलती मिळवतो, असा इशारा कलिबाफ यांनी दिला. सध्या इराणचे संपूर्ण लक्ष "युद्ध संपवण्यावर" आहे आणि ते अणू योजनेच्या तपशीलांवर कोणतीही चर्चा करत नाहीत.

सेनेची लोकशाही रचना उद्धव यांनी बदलली; शिंदे गटाच्या वकिलांचा आरोप, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मराठा समाज आक्रमक, अनेक जिल्ह्यांत आंदोलन

एसटी आता 'विना वाहक'; महामंडळाची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी मनुष्यबळ खर्चात कपात

गणेश गल्लीत अवतरणार 'संतभूमी'! संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे जिवंत दर्शन देखाव्यांतून घडविणार

अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेमधील अतिक्रमणे हटवली; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा