अमेरिका आणि इराणमध्ये सातव्या दिवशी हवाई हल्ले तीव्र (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

अमेरिका आणि इराणमध्ये सातव्या दिवशी हवाई हल्ले तीव्र

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिका आणि इराणमधील संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे.

Swapnil S

दुबई : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिका आणि इराणमधील संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. शनिवारी दोन्ही देशांनी सातव्या दिवशी एकमेकांच्या लष्करी तळांना आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले केले.

या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या जलमार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून या भागात सलग हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. अमेरिका आणि इस्रायलने चार महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या युद्धातील अंतरिम युद्धबंदीचा करार मोडीत निघाल्यामुळे, आता हा संघर्ष कधी थांबणार याबाबत कोणतीही स्पष्टता उरलेली नाही.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सलग सातव्यांदा करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे 'पाळत ठेवणारे तळ, लष्करी रसद पुरवठा यंत्रणा, जमिनीखालील शस्त्रास्त्रांचे कोठार आणि सागरी क्षमता' नष्ट करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या होर्मोजगान प्रांतातील एक वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्प उद्ध्वस्त झाला आहे. तसेच बंदर अब्बास या महत्त्वाच्या बंदराला जोडणारे दोन बोगदे आणि रेल्वे पूल नष्ट करण्यात आले आहेत, ज्यामुळे इराणचा संपर्क तुटला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

परराज्यातील ४७५ वाहनांवर RTO ची कारवाई; २४.०९ लाखांचा दंड वसूल

Ulhasnagar : एकाच घराला दिवसातून दोनदा आग

सलमान खानने 'बिश्नोईं'ची माफी मागावी - अनुप जलोटा

सलमान, रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबारानंतर घेतला निर्णय

सेवानिवृत्त झालेल्या महिलेचा पेन्शनवरील हक्क कायम; उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा