अमेरिकेकडून इराणचे ५ तेल टँकर नष्ट X
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेकडून इराणचे ५ तेल टँकर नष्ट

अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या संघर्षात आता पुन्हा एकदा मोठा भडका उडाला आहे. अमेरिकन युद्धनौकांवर झालेल्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत अमेरिकन लष्कराने इराणचे पाच तेल टँकर नष्ट केल्याचा दावा मंगळवारी केला आहे.

Swapnil S

वाशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या संघर्षात आता पुन्हा एकदा मोठा भडका उडाला आहे. अमेरिकन युद्धनौकांवर झालेल्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत अमेरिकन लष्कराने इराणचे पाच तेल टँकर नष्ट केल्याचा दावा मंगळवारी केला आहे. या कारवाईनंतर संतप्त झालेल्या इराणने जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे डागली.

इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या कारवाईनंतर इराणने जॉर्डनमधील अमेरिकन तळांवर थेट क्षेपणास्त्रे डागली. जॉर्डनच्या लष्कराने स्पष्ट केले की, त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने इराणकडून डागलेली १८ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली, तर दोन क्षेपणास्त्रे मानवी वस्ती नसलेल्या भागात कोसळली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. जॉर्डन हा अमेरिकेचा महत्त्वाचा मित्रदेश असून तेथे अमेरिकन लष्करी तळ आहेत, ज्यामुळे इराणकडून या तळांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP आंदोलकाला नोटीस; सरन्यायाधीशांनी दंडाधिकाऱ्यांना फटकारले

विकास प्रकल्पांना गती; 'महाराष्ट्र लँड बँक', 'महाभूमी स्टॅक' प्रणालीचे महसूलमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक

Mumbai : गणेशोत्सवात विद्यापीठाचे दीड हजार ‘सारथी’; NSS चे विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला

मराठा-मराठा संघर्ष झाल्यास त्याला सर्वस्वी शिंदेच जबाबदार, मनोज जरांगे यांचा इशारा