प्रातिनिधिक छायाचित्र  
आंतरराष्ट्रीय

आमच्यामार्फतच भारताला व्हेनेझुएलाचे तेल देऊ; अमेरिकेची ऑफर

अमेरिकेने व्हेनेझुएलावर ताबा मिळवल्यानंतर तेथील खनिज तेलाच्या विक्री करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. अमेरिकेच्या नियंत्रणाखाली भारताला व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीला परवानगी देण्यास देण्यात येईल, असे संकेत ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहेत.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेने व्हेनेझुएलावर ताबा मिळवल्यानंतर तेथील खनिज तेलाच्या विक्री करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. अमेरिकेच्या नियंत्रणाखाली भारताला व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीला परवानगी देण्यास देण्यात येईल, असे संकेत ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहेत. या निर्णयामुळे अमेरिकन प्रतिबंधामुळे बंद पडलेली भारत-व्हेनेझुएला तेल खरेदी सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारताला कच्च्या तेलाच्या खरेदी करण्यास पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळेल का? यावर ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारताला व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीच्या प्रक्रियेबाबत काम सुरू आहे. अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस्टोफर राइट यांनी सांगितले होते की, अमेरिका सर्वच देशांना व्हेनेझुएलाचे तेल विकण्यास तयार आहे. अमेरिका व्हेनेझुएलातील तेल काढण्यास परवानगी देणार आहे. मात्र, त्यासाठीचे कठोर नियम पाळावे लागतील. दरम्यान, अमेरिकन निर्बंधापूर्वी भारत हा व्हेनेझुएलाचा सर्वात मोठा ग्राहक होता. भारताला व्हेनेझुएलाचे तेल मिळाल्यास भारताच्या ऊर्जा आयातीत विविधता येईल.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन