Photo : X
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेची WHOला कायमची सोडचिठ्ठी; जिनिव्हा मुख्यालयाबाहेरील ध्वजही उतरवला

अमेरिकेच्या आरोग्य आणि परराष्ट्र विभागाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून जिनिव्हा येथील 'डब्ल्यूएचओ'च्या मुख्यालयाबाहेर असलेला अमेरिकेचा राष्ट्रध्वजही उतरवण्यात आला आहे.

Swapnil S

जिनिव्हा : अमेरिका अखेर जागतिक आरोग्य संघटनेतून (डब्ल्यूएचओ) अधिकृतपणे बाहेर पडली आहे. अमेरिकेच्या आरोग्य आणि परराष्ट्र विभागाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून जिनिव्हा येथील 'डब्ल्यूएचओ'च्या मुख्यालयाबाहेर असलेला अमेरिकेचा राष्ट्रध्वजही उतरवण्यात आला आहे.

अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आमची निरीक्षक म्हणून सहभागी होण्याची किंवा भविष्यात पुन्हा या संघटनेत सामील होण्याची कोणतीही शक्यता नाही. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, रोगांचे निरीक्षण आणि इतर सार्वजनिक आरोग्य संबंधित आम्ही आंतरराष्ट्रीय संघटनांऐवजी इतर देशांसोबत थेट काम करू. अमेरिकेच्या मते, हा निर्णय कोविड-१९ महामारीच्या व्यवस्थापनात संयुक्त राष्ट्रांच्या या आरोग्य संस्थेचे अपयश दर्शवतो.

थकबाकी भरली

अमेरिकन कायद्यानुसार, संघटना सोडण्यासाठी एक वर्ष आधी सूचना देणे आणि सर्व थकबाकी भरणे आवश्यक आहे. संघटनेच्या मते, अमेरिकेवर २६ कोटी डॉलरची थकबाकी आहे. संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, अमेरिकेने २०२४ आणि २०२५ ची थकबाकी अद्याप भरलेली नाही. मात्र, अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, अमेरिकन जनतेने आधीच पुरेसा पैसा भरला आहे.

Mumbai : मालाडवासीयांच्या मदतीसाठी कंट्रोल रूम; वायफाय आधारित आधुनिक कॅमेऱ्यांची नजर, पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत ठरणार उपयुक्त

Mumbai : दादरमध्ये BEST बसचा भीषण अपघात; एकामागोमाग एक वाहनांना दिली धडक; एकाचा मृत्यू, Video

फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा हाय अलर्ट जारी, थरकाप उडवणारे Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात जलवाहिनी बिघाडाचा फटका; दुरुस्ती पूर्ण, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता

Mumbai : प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये मिळणार घरे; एक हजार ‘पीएपी’ घरे ऑगस्टपर्यंत तयार, मुलुंडमधील प्रकल्प मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करणार