आंतरराष्ट्रीय

America : व्हाइट हाऊसजवळ गोळीबार; २ नॅशनल गार्ड्स जखमी

अमेरिकेत बुधवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारात दोन नॅशनल गार्ड्स गंभीर जखमी झाले. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून हल्ल्यात सामील असलेल्या संशयिताचे नाव रहमानुल्लाह लाकनवाल असे आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेत बुधवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारात दोन नॅशनल गार्ड्स गंभीर जखमी झाले. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून हल्ल्यात सामील असलेल्या संशयिताचे नाव रहमानुल्लाह लाकनवाल असे आहे. तो ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानमधून अमेरिकेत आला होता. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल गार्डवरील गोळीबाराचा ‘दहशतवादी कृत्य’ असा उल्लेख केला असून आरोपीला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे म्हटले आहे. अमेरिकेचा न्याय विभाग या प्रकरणाची दहशतवादी हल्ला म्हणून चौकशी करत आहे. हल्ल्यानंतर, ट्रम्प यांनी पेंटागॉनला वॉशिंग्टन डीसीमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी ५०० अतिरिक्त नॅशनल गार्ड्स पाठवण्याचे निर्देश दिले.

महिला गार्डला गोळी

हा हल्ला फॅरागट वेस्ट मेट्रो स्टेशनजवळ झाला, जिथे लाकनवाल काही काळ वाट पाहत होता आणि नंतर अचानक २.१५ च्या सुमारास त्याने गोळीबार सुरू केला. न्यूयॉर्क पोस्टनुसार, त्याने आधी एका महिला गार्डच्या छातीत गोळी मारली आणि नंतर डोक्यात आणि त्यानंतर त्याने दुसऱ्या गार्डवर गोळीबार केला. त्याच वेळी जवळच असलेल्या तिसऱ्या गार्डने धावपळ करून हल्लेखोराला ताब्यात घेतले. अटक होण्यापूर्वी लाकनवालला चार गोळ्या लागल्या होत्या आणि त्याला जवळजवळ कपड्यांविना रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.

Iran vs Israel-US War : सौदीच्या रियाधमध्ये इराणी ड्रोनचा अमेरिकन दूतावासावर हल्ला, भीषण आगीचा Video व्हायरल

राज्यसभा निवडणुकीत मविआत कोणताही तिढा नाही! आदित्य ठाकरे यांनी केले स्पष्ट

महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी नावे समोर येण्याची शक्यता! मनोज जरांगे पाटील यांचा दावा

लग्नाच्या वाटेतील अडथळा ठरला लिव्ह-इन पार्टनर; अभिनेत्रीने प्रियकरासोबत रचला खुनाचा डाव, तब्बल १२ दिवस…

Mumbai : अल्पवयीन मित्रांनीच घेतला मित्राचा जीव; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात टाकून बुडाल्याचा बनाव