दिवसभर थकवा, पण रात्री झोप येत नाही? 'हे' ५ मिनिटांचे सोपे रुटीन नक्की ट्राय करा! 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

दिवसभर थकवा, पण रात्री झोप येत नाही? 'हे' ५ मिनिटांचे सोपे रुटीन नक्की ट्राय करा!

रात्री अंथरुणावर गेल्यानंतरही झोप येत नाही? झोपण्यापूर्वी फक्त ५ मिनिटे करा हे ३ सोपे योगासन आणि शरीर-मन रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा.

Mayuri Gawade

दिवसभराचा थकवा असूनही रात्री अंथरुणावर गेल्यानंतर झोप काही केल्या येत नाही? डोक्यात विचारांची गर्दी, वारंवार होणारी झोपमोड किंवा उशिरापर्यंत जागं राहण्याची सवय असेल, तर झोपण्यापूर्वीचा काही मिनिटांचा रिलॅक्सिंग रुटीन उपयोगी ठरू शकतो.

फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, झोपण्यापूर्वी काही सोप्या योगासनांच्या मदतीने शरीर आणि मन रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करता येतो. यासाठी वेगळा वर्कआउट सेशन करण्याची गरज नाही. बेडवर जाण्यापूर्वी फक्त पाच मिनिटे या हालचालींसाठी द्या.

झोपण्यापूर्वी करा हे ३ योगासन

१. सपोर्ट घेऊन रिलॅक्स व्हा

सुरुवातीला वज्रासनात बसा. पाठीमागे उशी किंवा कुशन ठेवा. त्यानंतर हळूहळू शरीर मागच्या बाजूला झुकवत पाठ उशीवर टेकवा. हात आरामदायी स्थितीत ठेवा आणि शरीरावरचा ताण सोडण्याचा प्रयत्न करा. काही वेळ याच स्थितीत शांत राहा.

२. बटरफ्लाय पोझिशननंतर रिलॅक्सिंग स्ट्रेच

बटरफ्लाय पोझिशनमध्ये बसून सुरुवात करा. त्यानंतर पाठीमागे उशी ठेवून सावकाश मागे झोपा. डोळे बंद करा. हात शरीराच्या बाजूला किंवा डोक्याच्या वर ज्या स्थितीत आरामदायी वाटतील, त्या पद्धतीने ठेवा. साधारण पाच मिनिटे शरीराला पूर्णपणे रिलॅक्स होऊ द्या.

३. भिंतीचा आधार घेत विपरित करणी

पाठीवर झोपा आणि दोन्ही पाय भिंतीवर वरच्या दिशेने टेकवा. गुडघे शक्य तितके सरळ ठेवा. हात शरीराच्या दोन्ही बाजूंना सैल सोडा. या स्थितीत साधारण ४ ते ५ मिनिटे शांतपणे राहा.

दिवसभराच्या धावपळीनंतर झोपण्यापूर्वी शरीराला आणि मनाला शांत होण्यासाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे रात्रीची झोप सुधारण्यासाठी अशा हलक्या रिलॅक्सेशन रुटीनचा प्रयत्न करता येऊ शकतो. मात्र, झोपेची समस्या वारंवार होत असेल किंवा दीर्घकाळ टिकत असेल, तर केवळ व्यायामावर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च