हिवाळ्यात जेवणाचा स्वाद दुप्पट करेल 'ही' आंबट-गोड आवळा चटणी, पाहा सोपी रेसिपी 
लाईफस्टाईल

हिवाळ्यात जेवणाचा स्वाद दुप्पट करेल 'ही' आंबट-गोड आवळा चटणी, पाहा सोपी रेसिपी

हिवाळ्यात आवळ्याचा स्वाद आणि पौष्टिकता दोन्हींचा आनंद घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आंबट-गोड आवळा चटणी. ही चटणी फक्त स्वादिष्ट नाही तर इम्युनिटी मजबूत ठेवण्यास सुद्धा मदत करते.

Mayuri Gawade

हिवाळ्यात आवळ्याचा स्वाद आणि पौष्टिकता दोन्हींचा आनंद घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आंबट-गोड आवळा चटणी. ही चटणी फक्त स्वादिष्ट नाही तर इम्युनिटी मजबूत ठेवण्यास सुद्धा मदत करते. जेवणात एक चमचा चटणी घेतली की जेवणाचा आनंद दुप्पट होतो. चला तर मग, पाहुयात ही पोषक तत्वांनी भरपूर आवळा चटणी तयार करण्याची सोपी रेसिपी.

साहित्य (४-५ लोकांसाठी) :

  • आवळे - ४०० ग्रॅम

  • मनुके - १ चमचा

  • मोहरीचं तेल - २ मोठे चमचे

  • भाजलेले जिरे - १ छोटा चमचा

  • बडीशेप - १ छोटा चमचा

  • मीठ - चवीनुसार

  • तिखट - १ छोटा चमचा

  • भाजलेली बडीशेप पावडर - १ मोठा चमचा

  • हळद - अर्धा चमचा

  • गूळ - १०० ग्रॅम

कृती :

सर्वप्रथम आवळे नीट धुवून कुकरमध्ये पाणी घालून २-३ शिट्ट्या येईपर्यंत उकळवा. पर्याय म्हणून आवळे किसूनही वापरता येतात. उकडल्यानंतर थोडे थंड होऊ द्या आणि आवळ्यांच्या फोड्या वेगळ्या करा, बिया काढा.

एका कढईत मोहरीचं तेल गरम करून त्यात जिरे आणि बडीशेप घालून फोडणी द्या. त्यानंतर आवळ्याचे तुकडे मंद आचेवर १ मिनिट परतवा. नंतर हळद, मीठ, लाल तिखट, धण्याची पूड, जिऱ्याची पूड आणि मनुका घालून २ मिनिटे शिजवा.

भाजलेल्या बडीशेप पावडर आणि गूळ घालून ३-४ मिनिटे हलक्या आचेवर शिजवा, गूळ नीट वितळून मिश्रणात मिसळत राहा. या प्रक्रियेनंतर अंदाजे अर्ध्या तासात आंबट-गोड आवळा चटणी तयार होते. दररोज १ चमचा ही चटणी खाल्ल्यास हिवाळ्यात इम्युनिटी वाढण्यास मदत होते आणि जेवणाची चवही खुलते.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके