फोटो सौ : FPJ
लाईफस्टाईल

त्वचेला लावा अ‍ॅलोवेरा जेल...'हे' होतील आश्चर्यचकीत करणारे फायदे

अ‍ॅलोवेरा जेलचे त्वचेसाठी मोठ्या प्रमाणात फायदे आहेत. नेमके काय फायदे आहेत ते जाणून घेण्यासाठी पुढे दिलेली माहिती एकदा नक्की वाचा.

Krantee V. Kale

अ‍ॅलोवेरा म्हणजे कोरफड ही एक नैसर्गिक वनस्पती आहे. अनेक समस्यांवर फायदेशीर असलेल्या या वनस्पतीपासून आपल्या आरोग्याला अनेक प्रकाराचे फायदे होतात. ही औषधी वनस्पती विशेषतः आपल्या त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहे. अ‍ॅलोवेराचे त्वचेसाठी नेमके काय फायदे आहेत, ते जाणून घेण्यासाठी पुढे दिलेली माहिती एकदा नक्की वाचा.

जर तुमच्या त्वचेवर लालसरपणा, डाग, मुरुमे, काळी वर्तुळं, पुरळ किंवा सनबर्न होत असेल तर अ‍ॅलोवेरा जेल लावल्याने आराम मिळतो व त्वचेवर ग्लो येतो. यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडन्ट्समुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

अ‍ॅलोवेरा जेल एक मॉइस्चरायझर म्हणून काम करते. त्वचेला हायड्रेट करून ती सॉफ्ट आणि मुलायम बनवते. यामध्ये असलेल्या विटामिन E आणि C मुळे त्वचेची टोन सुधारते आणि त्वचा ताजीतवानी राहण्यास मदत होते. हे जेल केसांच्या मुळांवर देखील चांगले प्रभावी आहे, अ‍ॅलोवेरा जेल केसांना लावल्यानंतर केसांचे आरोग्य नीट राहते तसेच केंसाना पोषण मिळते व त्यांची वाढ जास्त प्रमाणात होते.

अ‍ॅलोवेरात असलेले पाणी त्वचेला आणि ओठांना हायड्रेट करून त्यांना मुलायम बनवते. अ‍ॅलोवेरा जेलच्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचेवरील मुरुम आणि पिंपल्स कमी करण्यास मदत होते.

अ‍ॅलोवेरा जेल नियमीत लावल्याने त्वचेवरील मृतपेशी कमी होण्यास मदत होते. एकंदरीत, त्वचेसाठी अ‍ॅलोवेरा जेल एक नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय आहे, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य नीट राहते व त्वचेच्या अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी