गोड खायचंय पण कॅलरी वाढण्याची भीती? चिंता सोडा अन् झटपट बनवा पौष्टिक चणा-मखाणा बर्फी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

गोड खायचंय पण कॅलरी वाढण्याची भीती? चिंता सोडा अन् झटपट बनवा पौष्टिक चणा-मखाणा बर्फी

गोड खावंसं वाटतंय पण साखरेची चिंता आहे? घरच्या घरी चणा-मखाणा बर्फी बनवा. झटपट तयार होणाऱ्या या बर्फीची सोपी रेसिपी पाहा.

Mayuri Gawade

गोड पदार्थ म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं; पण साखर आणि कॅलरीचा विचार करून अनेकजण गोड खाणं टाळतात. अशावेळी घरच्या घरी कमी वेळात तयार होणारी चणा-मखाणा बर्फी हा एक पर्याय ठरू शकतो. भाजलेले चणे, मखाणे, ड्रायफ्रुट्स आणि गूळ यामुळे ही बर्फी चवीसोबत पौष्टिक घटकही देते. विशेष म्हणजे सणवार नसतानाही गोड खाण्याची इच्छा झाली, तरी ही रेसिपी करून पाहता येईल.

साहित्य

  • भाजलेले चणे - १५० ग्रॅम

  • मखाणे - अर्धा कप

  • काजू-बदाम - अर्धा कप

  • सुके खोबरे - अर्धा कप

  • गूळ - १ कप

  • साजूक तूप - गरजेनुसार

  • वेलची पूड - अर्धा चमचा

  • केसर आणि जायफळ पूड - प्रत्येकी १ चिमूट

  • पाणी - आवश्यकतेनुसार

  • पिस्त्याचे काप - सजावटीसाठी

कृती

सर्वप्रथम भाजलेले चणे आणि मखाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात काजू-बदामाची पावडर, सुके खोबरे, वेलची, केसर आणि जायफळ पूड मिसळा.

कढईत थोडं तूप घालून हे मिश्रण मंद आचेवर हलकं भाजून घ्या. दुसऱ्या भांड्यात गूळ, चमचाभर तूप आणि थोडं पाणी घेऊन गूळ विरघळवून घ्या. गुळाचा पाक तयार झाल्यावर तो चणा-मखाण्याच्या मिश्रणात घालून व्यवस्थित एकजीव करा.

तयार मिश्रण तुपाचा हात लावलेल्या ताटात पसरवा. वरून पिस्त्याचे काप लावून थंड होऊ द्या आणि वड्या कापा. अशा प्रकारे झटपट घरच्या घरी चविष्ट चणा-मखाणा बर्फी तयार होईल.

मराठवाड्यातील शाळांची दुरवस्था! केवळ इमारती 'हजर'; वीज, बाके, स्वच्छतागृहे 'गैरहजर'; 'स्कूल ठीक करो'तून समोर आले वास्तव

आजचे राशिभविष्य, ३० ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

'सिप्ला फार्मा'ला दिलासा! औषध परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे; उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर FDA ची माघार

'हे शेवटचं आंदोलन...'; मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, सरकारला थेट इशारा

Mumbai : चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक समोर; पारंपरिक रूपाने जिंकली भाविकांची मनं