'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Summer Special : उन्हाळ्यात थंडावा देणारे खास पेय; वाचा 'कोकोनट लाइम कूलर' ची सोपी रेसिपी

कोकोनट लाइम कूलर असे नाव असणारे हे पेय चविष्ट, थंड आणि शरीराला आराम देणारे आहे.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळा सुरू झाला की उन्हाच्या त्रासात शरीराला थंडावा देणारे आणि ताजेतवाने ठेवणारे पेय आवश्यक ठरतात. प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी सोशल मीडियावर एक खास समर ड्रिंकची रेसिपी शेअर केली आहे. कोकोनट लाइम कूलर असे नाव असणारे हे पेय चविष्ट, थंड आणि शरीराला आराम देणारे आहे.

साहित्य :

  • पाणी - १/२ कप

  • अगर पावडर - ३ टेबलस्पून (समुद्री शैवालापासून बनवलेली पूड)

  • साखर - १/४ कप

  • नारळाचा गर - १/४ कप

  • खाद्य फुले - ३ ते ४ (गुलाब, जास्वंद, मोगरा)

  • बर्फाचे तुकडे

  • पुदिन्याची पाने

  • लिंबाच्या फोडी

  • नारळ पाणी

  • ड्रिंकिंग सोडा

कृती :

एका पॅनमध्ये पाणी, अगर पावडर आणि साखर घालून साखर पूर्ण विरघळेपर्यंत ढवळा.
वेगळ्या ट्रेमध्ये नारळाचा गर आणि खाद्य फुले घाला. त्यावर तयार केलेले अगर मिश्रण ओता आणि साधारण १ तास सेट होण्यासाठी ठेवा. जेली सेट झाल्यानंतर तिचे छोटे क्युब्स कापा. एका ग्लासमध्ये हे क्युब्स घाला आणि त्यात भरपूर बर्फ टाका. चव वाढवण्यासाठी पुदिन्याची पाने आणि लिंबाच्या फोडी घाला. शेवटी नारळ पाणी आणि ड्रिंकिंग सोडा ओता. तुमचा कोकोनट लाइम कूलर तयार!

टिप्स :

  • अधिक चवदार बनवण्यासाठी थोडासे मध किंवा गुळ वापरू शकता.

  • ड्रिंक सर्व्ह करण्यापूर्वी चांगले थंड करून घ्या.

  • पुदिन्याची पाने हाताने हलकी चुरडून टाकल्यास अधिक फ्लेवर येतो.

  • हेल्दी पर्यायासाठी साखरेऐवजी नैसर्गिक स्वीटनर वापरू शकता.

  • उन्हाळ्यातील उकाड्यात हा कूलर नक्कीच तुम्हाला ताजेतवाने ठेवेल.

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण

प्रयागराजमधील ड्रग्जची 'फॅक्टरी' उद्ध्वस्त; गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची कारवाई, ६९.७५९ किलो एमडी जप्त

एसआयटीकडून चौकशी करा! डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश मोर्चा

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी