मधुमेहींनो लक्ष द्या! शुगर वाढण्याची चिंता सतावतेय? जेवणानंतर फक्त १० मिनिटे करा 'हे' काम 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

मधुमेहींनो लक्ष द्या! शुगर वाढण्याची चिंता सतावतेय? जेवणानंतर फक्त १० मिनिटे करा 'हे' काम

मधुमेहामुळे जेवणानंतर रक्तातील साखर झपाट्याने वाढते? तज्ज्ञांनी सांगितलेले हे १० मिनिटांचे सोपे व्यायाम शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. खुर्चीवर बसून किंवा चालताना करता येणारे हे उपाय जाणून घ्या.

Mayuri Gawade

मधुमेह असलेल्या अनेकांना जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याची समस्या जाणवते. औषधे आणि योग्य आहारासोबतच काही साधे व्यायाम नियमित केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे यासाठी जिममध्ये जाण्याची किंवा कठीण व्यायाम करण्याची गरज नाही.

आहारतज्ज्ञांनी evolvewtnaz या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जेवणानंतर करता येणाऱ्या काही सोप्या व्यायामांची माहिती दिली आहे. या व्यायामांमुळे शरीरातील स्नायू सक्रिय होतात आणि अतिरिक्त साखर वापरण्यास मदत होते.

खुर्चीवर बसून करा हा सोपा व्यायाम

जेवण झाल्यानंतर खुर्चीवर ताठ बसावे. दोन्ही पाय जमिनीवर सरळ ठेवावेत. त्यानंतर पायाची बोटे जमिनीवर टेकवून टाचा शक्य तितक्या वर उचलाव्यात आणि पुन्हा खाली आणाव्यात.

ही क्रिया साधारण १० मिनिटे केल्यास पोटरीतील स्नायू सक्रिय होतात. त्यामुळे शरीरात साठवलेले ग्लायकोजेन वापरले जाऊ लागते. परिणामी रक्तातील साखर वेगाने वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो.

चालण्याच्या या दोन पद्धतीही ठरू शकतात फायदेशीर

पोटरीचे स्नायू सक्रिय करण्यासाठी आणखी काही सोपे व्यायामही करता येतात.

सर्वप्रथम ताठ उभे राहून पायाची बोटे वर उचलावीत आणि फक्त टाचांवर चालण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर टाचा वर उचलून केवळ पायाच्या बोटांवर चालावे.

या दोन्ही प्रकारे ८ ते १० मिनिटे चालल्यास पायांच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

लक्षात ठेवा...

हे व्यायाम मधुमेह नियंत्रणासाठी पूरक ठरू शकतात. मात्र औषधे, आहार किंवा उपचारांमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार