Hanuman Jayanti 2026 : "एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान"; हनुमान जयंतीनिमित्त शेअर करा खास शुभेच्छा 'एआय' ने बनवलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Hanuman Jayanti 2026 : "एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान"; हनुमान जयंतीनिमित्त शेअर करा खास शुभेच्छा

या खास दिवशी आपल्या मित्र-परिवाराला आणि नातेवाईकांना पाठवण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश...

किशोरी घायवट-उबाळे

हनुमान जयंती हा भगवान श्रीरामांचे परमभक्त, शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या श्री हनुमानाचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भक्तगण मंदिरात जाऊन दर्शन घेतात, हनुमान चालिसा पठण करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. या खास दिवशी आपल्या मित्र-परिवाराला आणि नातेवाईकांना पाठवण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश...

हनुमान जयंतीच्या खास शुभेच्छा संदेश

  • अंजनीचा सुत तू, रामाचा तू भक्त,
    तुझ्या कृपेने दूर होतात सर्व संकट!
    हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • बजरंगबलीची कृपा तुमच्यावर सदैव राहो,
    संकटांपासून तुमचे रक्षण होवो,
    हनुमान जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

  • शौर्य, शक्ती आणि भक्तीचा संगम असलेले
    श्री हनुमान तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणोत!
    हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

  • संकटमोचन हनुमान तुमच्या सर्व अडचणी दूर करो,
    तुमच्या जीवनात आनंद आणि यश भरभरून येवो!
    हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • जय हनुमान ज्ञान गुण सागर,
    तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होवो!
    हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

  • रामभक्त हनुमानाच्या आशीर्वादाने
    तुमचे सर्व कार्य सफल होवोत,
    हीच प्रार्थना! हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

  • ताकद, धैर्य आणि विश्वास देणाऱ्या
    हनुमंताच्या कृपेने तुमचे जीवन उजळून निघो!
    हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

या हनुमान जयंतीनिमित्त हे संदेश आपल्या प्रियजनांना पाठवा आणि भक्तीचा हा उत्सव आनंदाने साजरा करा.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल