फोटो सौ : FPJ
लाईफस्टाईल

छातीत जळजळ किंवा आंबट ढेकर येतात? घरीच करा 'हे' उपाय

छातीत जळजळण्यावर काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे आराम मिळवता येऊ शकतो. पुढे दिलेले उपाय एकदा नक्की करुन बघा.

Krantee V. Kale

छातीत जळजळ-आंबट ढेकर याला ऍसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स (GER) असेही म्हणतात. जेव्हा पचनसंस्थेतील आम्ल (ऍसिड) पोटातून इसोफेगस म्हणजेच अन्ननलिकेमध्ये जाते, ज्यामुळे छातीत जळजळ होऊ लागते, ज्याला 'हार्टबर्न'ही म्हणतात. जर हे सतत होत असेल तर ते गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स (GERD) यासारख्या गंभीर आजाराला देखील आमंत्रण मिळू शकते.

छातीत जळजळण्यावर काही घरगुती उपाय

सर्वात प्रथम, तुम्ही अधिक पाणी प्यायला हवं, कारण पाणी पिल्याने पचनसंस्थेतील आम्ल कमी होऊन छातीतील जळजळ कमी होऊ शकते. छातीत जळजळण्यावर कोमट किंवा गार दूध पिणे हा देखील उत्तम पर्याय आहे. दुधामुळे आम्लाचे प्रमाण कमी होते आणि आरामही मिळेल.

बेकिंग सोड्याचाही उपयोग होऊ शकतो.एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून प्यायल्याने छातीतील जळजळ कमी होऊ शकते.

आले देखील एक चांगला उपाय आहे. आले पचन सुधारण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकते, त्यामुळे तुम्ही आले टाकून चहा देखील पिऊ शकता.

स्मोकिंग आणि मद्यपान हे आम्ल वाढवू शकतात, त्यामुळे या पासून दूर राहणं उत्तम. त्यामुळे स्मोकिंग आणि मद्यपान शक्यतो टाळावे.

बडीशेप किंवा बडीशेपच्या पावडरचे तुम्ही जेवणानंतर सेवन करू शकता ज्यामुळे चांगला आराम मिळू शकतो. शक्यतो मसाल्याचे पदार्थ किंवा जड अन्न खाल्यानंतर बडीशेप खा. ज्यामुळे अन्नपचन देखील चांगले होते.

ऍसिड रिफ्लक्स होण्याची मुख्य कारणं म्हणजे पोटातील आम्ल (ऍसिड) इसोफेगस म्हणजेच अन्ननलिकेमध्ये मध्ये परत जाणे. साधारणतः, याचे कारण जास्त मसालेदार किंवा आम्लयुक्त पदार्थ खाणे, मद्यपान किंवा धूम्रपान करणे, जास्त ताणतणाव, आणि कमी झोप अशा गोष्टी असू शकतात. यावर वरील सर्व उपाय तुम्हाला आराम देऊ शकतात, पण जर रिफ्लक्स खूप गंभीर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Mumbai Local Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

'देव त्यांचं भलं करो'; तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारने सोडलं मौन

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका