ड्राय झालेला चेहरा होईल तुकतुकीत; लावा घरातलेच ३ पदार्थ; महागड्या क्रीमची गरज नाही 
लाईफस्टाईल

ड्राय झालेला चेहरा होईल तुकतुकीत; लावा घरातलेच ३ पदार्थ; महागड्या क्रीमची गरज नाही

बदलत्या वातावरणाचा सर्वात आधी परिणाम होतो तो त्वचेवर. चेहरा कोरडा पडतो, खरखरीत वाटतो, कधी कधी तर त्वचा सोलूही लागते. अशावेळी अनेक जण महागडी क्रीम, सीरम, लोशन वापरतात; पण तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही. या ऐवजी स्वयंपाकघरातले साधे पदार्थच तुमच्या त्वचेला नैसर्गिक ओलावा देऊ शकतात.

Mayuri Gawade

बदलत्या वातावरणाचा सर्वात आधी परिणाम होतो तो त्वचेवर. चेहरा कोरडा पडतो, खरखरीत वाटतो, कधी कधी तर त्वचा सोलूही लागते. अशावेळी अनेक जण महागडी क्रीम, सीरम, लोशन वापरतात; पण तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही. या ऐवजी स्वयंपाकघरातले साधे पदार्थच तुमच्या त्वचेला नैसर्गिक ओलावा देऊ शकतात. नियमित वापर केल्यास त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार दिसू शकते.

१) केळीची पेस्ट – त्वचेला नैसर्गिक मॉइश्चर

पिकलेलं केळं त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. त्यात असलेले नैसर्गिक घटक त्वचेला पोषण देतात आणि कोरडेपणा कमी करतात.

एक पिकलेलं केळं नीट मॅश करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. साधारण ३०–४५ मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून २–३ वेळा हा उपाय केल्यास त्वचेतील रुखरुख कमी होण्यास मदत होते.

२) मका-ज्वारीचं पीठ आणि साय - सौम्य स्क्रब आणि हायड्रेशन

घरात सहज मिळणारे मका आणि ज्वारीचे पीठ त्वचेवरील मृत पेशी हलक्या हाताने काढून टाकण्यास मदत करतात. त्यात थोडी साय (मलाई) मिसळल्यास त्वचेला अतिरिक्त ओलावा मिळतो.

हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. पूर्ण सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि नैसर्गिक चमकदार दिसू लागते.

३) खोबरेल तेल - खोलवर ओलावा देणारा उपाय

खोबरेल तेल हे कोरड्या त्वचेसाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. त्यातील नैसर्गिक फॅटी ॲसिड्स त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात.

झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर अतिशय थोडं खोबरेल तेल हलक्या हाताने मसाज करा. सकाळी चेहरा स्वच्छ धुवा. विशेषतः हिवाळ्यात हा उपाय त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतो.

लक्षात ठेवा

त्वचेची काळजी घेताना पाणी पिणं, संतुलित आहार आणि पुरेशी झोप याकडेही लक्ष द्या. बाहेर पडताना थंड वाऱ्यापासून त्वचेचं संरक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

महागडी उत्पादने वापरण्याआधी घरगुती उपाय एकदा करून पाहा. सातत्य ठेवल्यास चेहऱ्यावरचा कोरडेपणा कमी होऊन त्वचा नैसर्गिकरित्या मऊ आणि तजेलदार दिसू शकते.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग