डब्यातल्या पोळ्या घामट किंवा ओलसर होतात? 'या' ३ सोप्या ट्रिक्सने उन्हाळ्यातही राहतील मऊ आणि ताज्या! 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

डब्यातल्या पोळ्या घामट किंवा ओलसर होतात? 'या' ३ सोप्या ट्रिक्सने उन्हाळ्यातही राहतील मऊ आणि ताज्या!

उन्हाळ्यात डब्यात ठेवलेल्या पोळ्या भिजट आणि ओलसर होतात? पोळ्या मऊ, ताज्या आणि कोरड्या ठेवण्यासाठी ३ सोप्या किचन ट्रिक्स जाणून घ्या.

Mayuri Gawade

उन्हाळ्यात स्वयंपाक करताना उकाड्यामुळे आधीच त्रास होतो. त्यात सकाळी घाईत पोळ्या करून डब्यात भरल्या की काही वेळातच त्या ओलसर, घामट आणि चिकट होतात. जेवणाच्या वेळी पोळ्यांचा ताजेपणा राहत नाही आणि खायलाही मन लागत नाही. विशेषतः ऑफिस, शाळा किंवा प्रवासासाठी डबा नेताना हा प्रश्न अनेकांना जाणवतो.

पोळ्या भिजट होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यातील उष्णता आणि डब्यात तयार होणारी वाफ. मात्र काही छोट्या सवयी बदलल्या, तर पोळ्या बराच वेळ मऊ, कोरड्या आणि ताज्या राहू शकतात.

१. गरम पोळ्या लगेच डब्यात भरू नका

पोळ्या तव्यावरून उतरल्यावर लगेच डब्यात भरल्यास त्यातून वाफ तयार होते. ही वाफ डब्यात अडकून पोळ्या ओलसर बनवते. त्यामुळे पोळ्या पूर्णपणे थंड झाल्यावरच डब्यात ठेवणं योग्य ठरतं.

२. डब्यात सुती कपडा किंवा टिश्यू वापरा

डब्याच्या तळाशी स्वच्छ सुती कपडा किंवा टिश्यू पेपर ठेवल्यास अतिरिक्त ओलावा शोषला जातो. पोळ्या ठेवून वरही हलका कपडा घातल्यास त्यांचा ताजेपणा टिकून राहू शकतो.

३. स्टीलच्या चमच्याची सोपी ट्रिक वापरून पाहा

हल्ली अनेकजण एक छोटी ट्रिक वापरतात. पोळ्या भरल्यानंतर डब्यात वरच्या बाजूला २ ते ३ स्टीलचे चमचे किंवा छोटी स्टील प्लेट ठेवतात. यामुळे आत तयार होणारी उष्णता कमी होण्यास मदत होते आणि पोळ्या कमी ओलसर राहतात.

उन्हाळ्यात डब्यातल्या पोळ्या ताज्या ठेवण्यासाठी छोटी काळजी

पोळ्या डब्यात ठेवताना घाई न करता थोडा वेळ द्या. योग्य पद्धतीने भरल्यास त्या बराच वेळ मऊ आणि खाण्यासाठी फ्रेश राहू शकतात.

जेवणाची चव फक्त भाजीवर नाही, तर पोळी किती मऊ आणि ताजी आहे यावरही अवलंबून असते. त्यामुळे उन्हाळ्यात या सोप्या ट्रिक्स वापरून डब्यातल्या पोळ्यांचा ताजेपणा टिकवून ठेवा.

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर

Mumbai : सहा मजली इमारत, सांस्कृतिक दालन, व्यायामशाळा, प्रशस्त सभागृह; नवीन पालिका सभागृहात आसन क्षमता १०० ने वाढणार

भारताची पहिली बुलेट ट्रेन आकाराला येतेय; ५५७ प्रवासी क्षमता; ताशी २४९ किमी वेग, बेंगळुरूच्या कारखान्यात बीईएमएलकडून ८ डब्यांची ट्रेन

Pankaja Munde Ramp Walk : मंत्री पंकजा मुंडेंचा हटके अंदाज; हॅण्डलूम साडीतील रॅम्प वॉक चर्चेत, Video