Summer Tips : आंबे खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मीरा कपूरने सांगितला भन्नाट फॉर्म्युला; एकदा ट्राय करून पाहाच  
लाईफस्टाईल

Summer Tips : आंबे खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मीरा कपूरने सांगितला भन्नाट फॉर्म्युला; एकदा ट्राय करून पाहाच

आंब्यामध्ये व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते, जे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. मात्र, आंब्यामधील...

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळा आला की आंब्यांची चव चाखण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र, आंबे खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स किंवा स्किन ब्रेकआउट्स होतात, अशी तक्रारही अनेक जण करताना दिसतात. आता अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी आणि उद्योजिका मीरा कपूर हिने याबाबतचा स्वतःचा अनुभव शेअर केला आहे.

आंब्यांमुळे त्वचेवर पिंपल्स

मीरा कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सांगितले की, तिला आंबे खाल्ल्यानंतर त्वचेवर पिंपल्स येत होते. त्यामुळे तिने तब्बल दोन वर्षे आंबे खाणे टाळले होते. विशेषतः सफेदा आणि लंगडा हे आंबे तिचे आवडते असल्याचेही तिने सांगितले.

मीरा म्हणाली, "मला आंबे खूप आवडतात. पण ते गरम पडतात आणि लगेच माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे मी दोन वर्षे आंबे खाणे जवळपास बंदच केले होते."

मीराचा समर बॅलन्स

मीरा कपूरने आता आंबे खाण्याची एक वेगळी पद्धत शोधून काढली आहे. ती आंब्यासोबत ताडगोळा (Ice Apple) आणि नारळपाणी घेत असल्याचे तिने सांगितले.

तिने लिहिले, "आता मी आंब्यासोबत दोन ताडगोळे आणि थोडं नारळपाणी घेते. त्यामुळे शरीरातील उष्णता संतुलित राहते आणि हा उपाय माझ्यासाठी काम करत असल्याचं मला जाणवत आहे." तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये कापलेले आंबे, नारळपाणी आणि ताडगोळे दिसत आहेत.

आंबे आणि त्वचेचा काय संबंध?

आंब्यामध्ये व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते, जे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. मात्र, आंब्यामधील नैसर्गिक साखर आणि काही लोकांच्या शरीराची संवेदनशीलता यामुळे काही वेळा पिंपल्स किंवा स्किन ब्रेकआउट्स वाढू शकतात.

फिटनेस आणि नाश्त्याबाबतही केला खुलासा

यापूर्वी मीरा कपूर आणि शाहिद कपूर यांनी एका पॉडकास्टमध्ये त्यांच्या फिटनेस रूटीनबाबतही खुलासा केला होता. मीरा म्हणाली होती की, शाहिदला आठवड्याचे सातही दिवस उत्तपम, सांबार आणि चटणी खायला आवडते. तर तिला पोहे आणि कोल्ड कॉफी आवडत असल्याचेही तिने सांगितले होते.

(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

मुंबईसह तीन विद्यापीठांत आता 'कुलपती पदक'; राज्यपालांच्या हस्ते मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश

GSB गणपतीचे १२ सप्टेंबरपासून दर्शन; मंडळाने उतरवला ७०३ कोटींचा विमा

अस्सल पैठणीला आता बारकोड आणि लोगोचा साज! राज्य शासनाचा निर्णय; स्कॅन करताच मिळणार धागा, कारागीर आणि निर्मितीची माहिती

सरसकट बंदी नको, आवाजाची मर्यादा आखून द्या; पुण्यातील तरुणांनी सुचवला उपाय