लाईफस्टाईल

शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता आहे? मग, आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

Swapnil S

निरोगी राहण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. नियमितपणे व्यायाम आणि संतुलित आहार करणे . आपल्या संतुलित आहारामध्ये शरीराला आवश्यक असणारे कॅल्शिअम, लोह, प्रथिने आणि जीवनसत्वे इत्यादी घटकांनी युक्त असलेले खाद्यपदार्थ असणे गरजेचे आहे. मात्र, यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे असणारे पोषकतत्व म्हणजे मॅग्नेशिअम हा आहे. फार कमी लोकांना माहित असेल की . मॅग्नेशिअम हे पोषकतत्व आपल्या शरीरातील स्नायू तयार करण्यास आणि नसा निरोगी ठेवण्यास खूप मदत करते. आपले शरीर पूर्णपणे कार्यक्षम बनविण्यात देखील मॅग्नेशिअम मदत करते.

शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता असली की शरीराच्या काही भागांमध्ये मुंग्या येणे, बधीरपणा, स्नायू क्रॅम्प्स, व्हेरिकोज व्हेन्स, भूक न लागणे, दमा, निद्रानाश, अशक्तपणा अशा अनेक समस्या उद्भवतात. आपल्या शरीरातील मॅग्नेशिअमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही काही खाद्यपदार्थांची मदत घेऊ शकता. चला जाणून घेऊया सविस्तर.

ज्वारीची भाकरी-

ज्वारीमध्ये फायबर्स आणि मॅग्नेशिअमचे खूप प्रमाणात आढळून येते. त्यामुळे, ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीचा वापर करून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला मॅग्नेशिअमचा पुरवठा होतो.

केळी-

केळ्यांमध्ये खूप प्रमाणात कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम आढळून येते. आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील हाडांना मजबूत बनवण्यासाठी केळी हा चांगला पर्याय आहे.

या शिवाय, केळ्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशिअम आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात. त्यामुळे, तुमच्या आहारात केळ्यांचा समावेश करायला अजिबात विसरू नका.

काजू-बदाम-

काजू आणि बदाम या सुकामेव्यापासून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. शरीराला आवश्यक असणारे प्रथिने, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फायबर्स असे पोषकघटक आपल्याला काजू-बदामचे सेवन केल्यामुळे मिळते. त्यामुळे, रोज मूठभर काजू-बदामचे सेवन करणे गरजेचे आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस