महाराष्ट्रात २०२६ मध्ये सार्वजनिक सुट्ट्या किती? एकाच क्लिकवर बघा यादी 
लाईफस्टाईल

महाराष्ट्रात २०२६ मध्ये सार्वजनिक सुट्ट्या किती? एकाच क्लिकवर बघा यादी

महाराष्ट्र सरकारने जाहिर केलेल्या यादीनुसार वर्ष २०२६ साठीच्या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये सण-उत्सव, राष्ट्रीय दिवस आणि सांस्कृतिक परंपरांचा समतोल राखण्यात आला असून, या सुट्ट्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू होणार आहेत.

Mayuri Gawade

नवीन वर्ष सुरू झालं की हातात कॅलेंडर घेतल्यावर सगळ्यात आधी एकच प्रश्न मनात येतो तो म्हणजे यंदा सुट्ट्या कधी आणि किती आहेत? कुठला सण वीकेंडला येतोय, कुठे सलग ब्रेक मिळतोय, आणि कुटुंब, मित्र किंवा छोट्या ट्रिपचं प्लॅनिंग कधी करता येईल, याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. २०२६ च्या कॅलेंडरकडे पाहताना हीच उत्सुकता यंदाही कायम आहे.

याच उत्सुकतेला उत्तर देत, महाराष्ट्र सरकारने वर्ष २०२६ साठीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची अधिकृत यादी आधीच जाहीर केली आहे. या कॅलेंडरनुसार सण-उत्सव, राष्ट्रीय दिवस आणि सांस्कृतिक परंपरांचा समतोल राखण्यात आला असून, या सुट्ट्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू होणार आहेत. या सुट्ट्यांव्यतिरिक्त राज्य सरकारने बँकांसाठी १ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. आपले वार्षिक रोखे पूर्ण करण्यासाठी ही सुट्टी फक्त बँकांसाठीच असणार आहे.

महाराष्ट्रात २०२६ मध्ये असणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी-

  • प्रजासत्ताक दिन : २६ जानेवारी, सोमवार

  • महाशिवरात्री : १५ फेब्रुवारी, रविवार

  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती : १९ फेब्रुवारी, गुरुवार

  • होळी (दुसरा दिवस) : ३ मार्च, मंगळवार

  • गुढीपाडवा : १९ मार्च, गुरुवार

  • रमझान ईद : २१ मार्च, शनिवार

  • रामनवमी : २६ मार्च, गुरुवार

  • महावीर जयंती : ३१ मार्च, मंगळवार

  • गुड फ्रायडे : ३ एप्रिल, शुक्रवार

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : १४ एप्रिल, मंगळवार

  • महाराष्ट्र दिन : १ मे, शुक्रवार

  • बुद्ध पौर्णिमा : १ मे, शुक्रवार

  • बकरी ईद : २८ मे, गुरुवार

  • मोहरम : २६ जून, शुक्रवार

  • स्वातंत्र्य दिन : १५ ऑगस्ट, शनिवार

  • पारशी नववर्ष दिन : १५ ऑगस्ट, शनिवार

  • ईद ए मिलाद : २६ ऑगस्ट, बुधवार

  • गणेश चतुर्थी : १४ सप्टेंबर, सोमवार

  • महात्मा गांधी जयंती : २ ऑक्टोबर, शुक्रवार

  • दसरा : २० ऑक्टोबर, मंगळवार

  • दिवाळी (लक्ष्मीपूजन) : ८ नोव्हेंबर, रविवार

  • दिवाळी (बलिप्रतिपदा) : १० नोव्हेंबर, मंगळवार

  • गुरुनानक जयंती : २४ नोव्हेंबर, मंगळवार

  • ख्रिसमस : २५ डिसेंबर, शुक्रवार

भाऊबीज सणाची विशेष सार्वजनिक सुट्टी

यंदाच्या कॅलेंडरमधली खास बाब म्हणजे दिवाळीतील भाऊबीज. भाऊ-बहिणीच्या नात्याला समर्पित असलेला हा सण बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी येत असून, यासाठी विशेष अतिरिक्त सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद अधिक निवांतपणे साजरा करता येणार आहे.

मध्यपूर्वेतील युद्धकाळात स्पाइसजेटची हेल्पलाईन बंद; प्रवाशांसाठी पर्यायी क्रमांक जाहीर

'राजमाता जिजाऊ' बस सेवेचा शुभारंभ; ३,००० नव्या गाड्यांमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीला चालना

Thane : मुंबईनंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार; भाडेवाढ नाही, प्रवाशांना दिलासा

Mumbai : विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना; २८ मार्चला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद, पाणी साठवण्याचे BMCचे आवाहन