लाईफस्टाईल

संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी बनवा 'मुगाच्या डाळीचे पौष्टिक सँडविच', जाणून घ्या सोपी रेसिपी

पौष्टिक आणि झटपट तयार होणाऱ्या पदार्थात मुगाच्या डाळीचे सँडविच हा उत्तम पर्याय ठरत आहे. प्रथिनांनी भरपूर असलेले हे सँडविच संध्याकाळचा नाश्ता, डबा किंवा हलक्या आहारासाठी योग्य आहे.

किशोरी घायवट-उबाळे

फास्ट फूडच्या वाढत्या सवयींमुळे आरोग्यावर परिणाम होत असताना अनेकजण हेल्दी आणि घरगुती पर्याय शोधत असतात. अशाच एका पौष्टिक आणि झटपट तयार होणाऱ्या पदार्थात मुगाच्या डाळीचे सँडविच हा उत्तम पर्याय ठरत आहे. प्रथिनांनी भरपूर असलेले हे सँडविच संध्याकाळचा नाश्ता, डबा किंवा हलक्या आहारासाठी योग्य आहे.

साहित्य :

  • १ कप मुगाची डाळ (४–५ तास भिजवलेली)

  • २–३ हिरव्या मिरच्या

  • १ इंच आल्याचा तुकडा

  • १/२ कप बारीक चिरलेला कांदा

  • १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर

  • चवीनुसार मीठ

  • १/२ चमचा हळद

  • १/२ चमचा जिरे

  • १/२ चमचा लाल तिखट (ऐच्छिक)

  • ब्रेड स्लाइस (ब्राऊन किंवा व्हाईट)

  • बटर किंवा तेल

  • चटणी (हिरवी किंवा टोमॅटो – ऐच्छिक)

कृती :

  • भिजवलेली मुगाची डाळ, हिरवी मिरची आणि आलं मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

  • या मिश्रणात कांदा, कोथिंबीर, मीठ, हळद, जिरे आणि तिखट घालून नीट मिसळा.

  • तव्यावर थोडे तेल किंवा बटर घालून ब्रेड स्लाइस ठेवा.

  • ब्रेडवर मुगाच्या डाळीचे मिश्रण पसरवा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजा.

  • गरमागरम सँडविच हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

टीप :

  • हेल्दी पर्यायासाठी ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरा.

  • मुलांसाठी बनवत असाल तर तिखट कमी ठेवा.

  • चव वाढवण्यासाठी किसलेले गाजर किंवा बीटही मिश्रणात घालू शकता.

  • हे सँडविच तेलाशिवाय नॉन-स्टिक तव्यावरही बनवता येते.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके