लाईफस्टाईल

'वेलेंटाइन डे' ला पार्टनरसाठी बनवा 'ही' विशेष डिश, तुमच्या जोडीदाराला करा खुश

तुमच्या जोडीदाराला खुश करा. चला तर मग जाणून घेऊ रेसिपी.

Rutuja Karpe

या वेलेंटाइन डे ला आपल्या पार्टनरसाठी घरच्या घरी काही तरी विशेष प्लान करण्याच्या विचारात आहात का? तर घरीच डेलिशियस स्ट्रॉबेरी केक बनवून तुमच्या जोडीदाराला खुश करा. चला तर मग जाणून घेऊ डेलिशियस स्ट्रॉबेरी केक रेसिपी. 

साहित्य-

1 वाटी स्ट्रॉबेरी 

200 gm लोणी 

1 चमचा क्रीम 

1 वाटी दूध 

1 मोठा चमचा 

1 1/2 चमचा मैदा 

मीठ चिमुटभर 

1/2 वाटी कोको 

1 1/2 चमचा बेकिंग पावडर 

1/4 वाटी केस्टर साखर 

सजवण्यासाठी क्रीम आणि स्ट्रॉबेरी 

कृती-  

स्ट्रॉबेरी केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी दुधात सिरका मिक्स करा. मैदयामध्ये मीठ, कोको, बेकिंग पावडर आणि साखर टाकून ते चाळने. वितळलेले लोणी आणि सिरका मिसळलेले दूध हे मिश्रण दोन मिनिट फेटा. आता एसेंस, दूध आणि क्रीम मिक्स करून दोन मिनिट फेटा. या मिश्रणाला दोन बरोबर भागात घेऊन बटर पेपरवर लावलेल्या बेकिंग ट्रे मध्ये टाकून 180 डि.सें. तपमान वर 30 ते 35 मिनिट बेक करणे. नंतर यात सूरी टाकून बघणे जर मिश्रण सुरीला चिटकले नाही तर समजा केक तयार झाला आहे. केक थंड झाल्यानंतर त्याला काढून घ्या केकच्या एक भागाला क्रीम लावा त्यावर तुमच्या आवाडीनुसार कापलेली स्ट्रॉबेरी सजवा. केकचा दूसरा भाग यावर ठेवणे. क्रीम आणि स्ट्रॉबेरीने केकच्या दुसऱ्या भागाला सजवून स्ट्रॉबेरी कोको केक वेलेंटाइन डे स्पेशल तुमच्या जोडीदाराला दया.  

Mumbai-Goa Highway : गणपतीत यंदाही वाहतूक कोंडीचे 'विघ्न'! माणगाव बाह्यवळण मार्गाला डिसेंबरचा मुहूर्त

एलपीजी सिलिंडर होणार महाग?

ज्यांची पत्रकार परिषद, त्यांनीच संवाद साधायला हवा! सुनील तटकरेंनी टोचले धनंजय मुंडेंचे कान

गडकरींशी संबंधित डीपफेक व्हिडिओ हटवा; उच्च न्यायालयाचे सोशल मिडीया कंपन्यांना आदेश

कर्जमुक्तीसाठी राज्यातील १.४० लाख शेतकरी अपात्र; १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या बँक कर्ज खात्यात दोन दिवसांत रक्कम जमा