Freepik
लाईफस्टाईल

मुळव्याधाच्या समस्येमुळे त्रस्त आहात; आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, काही दिवसांतच फरक जाणवेल; सौंदर्य समस्याही दूर होतील

आजची धावपळीची जावनशैली, चुकीची आहार पद्धती, झोपेची अनियमित वेळ, वाढत जाणारा मानसिक तणाव इत्यादींमुळे मुळव्याधाची समस्या वाढत चालली आहे. मूळव्याधवर शस्त्रक्रियेसारखे उपचार आज उपलब्ध असले तरी काहींना हा आजार पुन्हा पुन्हा होतो. त्यामुळे वारंवार शस्त्रक्रिया करणे हा फारसा चांगला पर्याय नाही. त्यामुळे मुळव्याधासारख्या समस्यांवर योग्य आहार हा एक उत्तम पर्याय असतो.

Kkhushi Niramish

आजची धावपळीची जावनशैली, चुकीची आहार पद्धती, झोपेची अनियमित वेळ, वाढत जाणारा मानसिक तणाव इत्यादींमुळे मुळव्याधाची समस्या वाढत चालली आहे. मूळव्याधवर शस्त्रक्रियेसारखे उपचार आज उपलब्ध असले तरी काहींना हा आजार पुन्हा पुन्हा होतो. त्यामुळे वारंवार शस्त्रक्रिया करणे हा फारसा चांगला पर्याय नाही. त्यामुळे मुळव्याधासारख्या समस्यांवर योग्य आहार हा एक उत्तम पर्याय असतो. या आजारात लोणी आणि खडीसाखर खाल्ल्याने चांगला फरक पडतो.

लोणी

लोणी हे दुग्धजन्य पदार्थ असून यामध्ये जीवनसत्त्व अ, ब १२ आणि के हे भरपूर प्रमाणात असते. आपल्याकडे परंपरेने आहारात लोण्याचा समावेश असणे हे आरोग्यासाठी उत्तम मानण्यात आले आहे. खासकरून ताजे लोणी आरोग्यासाठी चांगले असते, असे मानले गेले आहे. लोणी हे चवीला मधूर, स्वादिष्ट असून हे स्निग्ध असते. आयुर्वेदानुसार लोणी हे शरिराला नित्यनवीन करणारा पदार्थ आहे.

मूळव्याधावर लोणी उपयुक्त

मूळव्याधाच्या समस्येवर लोणी हे अत्यंत उपयुक्त असते. यामध्ये तुम्हाला शौचाच्या जागेतून रक्त पडत असेल, जळजळ होत असेल, टोचत असेल तर लोण्याचा आहारात समावेश करावाच सोबतच शौचाच्या जागेवर जिथे त्रास होत आहे, तिथेही लोणी चोळल्याने खूप आराम मिळतो.

लोणी आणि खडीसाखर

खडीसाखर ही सामान्य साखरेपेक्षा वेगळी असते. ही आरोग्यासाठी उत्तम मानली गेली आहे. खडीसाखर थंड गुणांची असते. लोण्यासोबत खडीसाखर खाल्ल्यास त्वरित फायदे मिळतात.

सौंदर्य समस्यांसाठी लोणी उपयुक्त

लोणी आणि खडीसाखर त्वचेच्या विविध समस्यांवर उपयुक्त असते. केवळ आहारातच नाही तर लोणी त्वचेवर ही लावावे. यामुळे चहेरा चमकदार होतो. हात-पायांची त्वचा देखील उत्तम होते. त्वचेला यामुळे पोषण मिळते. यामुळे नैसर्गिक स्क्रब होते. त्वचा मऊ होते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील लोणी खडीसाखर उपयुक्त असतात.

ओठांचा काळपटपणा कमी होतो

ओठ काळे पडले असेल तर लोण्यात केसर आणि खडीसाखरेने मालीश करावी काही दिवसात ओठांचा काळपटपणा कमी होईल.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Maharashtra Weather : पावसाचा तडाखा वाढणार; "समुद्रकिनारे, धबधब्यांपासून दूर राहा," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; रेल्वे मार्गावरील काम सुरू, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

Mumbai Rain : मुंबईसाठी रेड अलर्ट! ताशी ९० किमी वेगाने वादळी वारे; अतिवृष्टीचा इशारा, १५ हजार कर्मचारी तैनात

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा धोका वाढला; खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

Mumbai Rain : मुंबईच्या डबेवाल्यांनाही मुसळधार पावसाचा फटका; आज सेवा बंद