(Photo-Yandex)
लाईफस्टाईल

हिवाळ्यात बनवा गरमागरम स्वीट कॉर्न सूप; जाणून घ्या रेसिपी

घरच्या घरी अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते.

किशोरी घायवट-उबाळे

हिवाळ्यात गरमागरम काहीतरी प्यावंसं वाटतं. अशा वेळी शरीराला उब देणारं, चविष्ट आणि आरोग्यदायी स्वीट कॉर्न सूप हा उत्तम पर्याय ठरतो. घरच्या घरी अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते.

साहित्य:

  • १ कप स्वीट कॉर्न (उकडलेला)

  • १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर

  • १ टेबलस्पून बटर

  • १ टीस्पून बारीक चिरलेला लसूण

  • २ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा

  • १ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • ३ कप पाणी

  • मीठ चवीनुसार

  • काळी मिरी पावडर चवीनुसार

  • सजावटीसाठी कांद्याची पात किंवा कोथिंबीर

कृती :

सर्वप्रथम मिक्सरमध्ये अर्धा स्वीट कॉर्न थोड्या पाण्यासह जाडसर वाटून घ्या. कढईत किंवा पातेल्यात बटर गरम करा, त्यात लसूण आणि कांदा परतून घ्या. हिरवी मिरची घालून थोडं परता. त्यात वाटलेला कॉर्न घाला. त्यामध्ये पाणी घालून चांगलं उकळू द्या.

कॉर्नफ्लोअर पाण्यात विरघळवून सूपमध्ये मिक्स करून ढवळत राहा. मीठ आणि काळी मिरी घालून ५ ते ७ मिनिटे सूप घट्ट होईपर्यंत उकळवून घ्या. गरमागरम स्वीट कॉर्न सूप तयार! यावर कोथिंबीर टाकून सूप सर्व्ह करा.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग