व्हॉट्सॲप प्रीमियम प्लॅन लवकरच; कस्टम थीम, स्टिकर्स आणि नवीन फीचर्ससाठी किती पैसे मोजावे लागणार? 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

WhatsApp Plus: व्हॉट्सॲप प्रीमियम प्लॅन लवकरच; कस्टम थीम, स्टिकर्स आणि नवीन फीचर्ससाठी किती पैसे मोजावे लागणार?

WhatsApp ‘Plus’ नावाचा पेड प्लॅन लवकरच येणार आहे. थीम्स, स्टिकर्स आणि कस्टम फीचर्ससह हा प्लॅन काय आहे, किती खर्च येईल आणि भारतात किंमत किती असू शकते, जाणून घ्या.

Mayuri Gawade

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग ॲप WhatsApp ने पहिल्यांदाच वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी सबस्क्रिप्शन प्लॅनची चाचणी सुरू केली आहे. ‘WhatsApp Plus’ या नावाने येणारा हा प्रीमियम प्लॅन ॲपच्या वापरात अधिक वैयक्तिकरण (customisation) आणि नवीन फीचर्स देणार आहे. विशेष म्हणजे, हा प्लॅन ऐच्छिक असून सध्याच्या फ्री युजर्ससाठी कोणतेही फीचर्स बंद केले जाणार नाहीत.

‘WhatsApp Plus’ नेमकं काय आहे?

‘WhatsApp Plus’ हा प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन असून तो वापरकर्त्यांना ॲप अधिक आकर्षक आणि वैयक्तिक पद्धतीने वापरण्याची सुविधा देतो. यामध्ये ॲपच्या दिसण्यापासून ते काही अतिरिक्त फीचर्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध असतील.

काय असणार नवीन फीचर्स?

  • एक्सक्लुसिव्ह स्टिकर्स: प्रीमियम स्टिकर पॅक्स आणि अॅनिमेशनसह स्टिकर्स

  • थीम्स आणि कस्टम आयकॉन्स: १८ नवीन रंगांतील थीम्स आणि १४ प्रकारचे अॅप आयकॉन्स निवडण्याची सुविधा

  • २० चॅट्स पिन करण्याची सुविधा: फ्री युजर्सना ३ चॅट्स पिन करता येतात, तर Plus मध्ये २० चॅट्स पिन करता येतील

  • प्रीमियम रिंगटोन्स: महत्त्वाच्या कॉन्टॅक्ट्ससाठी १० वेगवेगळे खास रिंगटोन्स

  • बुल्क सेटिंग्स: एकाच वेळी अनेक चॅट्स किंवा ग्रुप्सवर एकसारखी सेटिंग लागू करण्याची सुविधा

किंमत किती असणार?

सध्या हा प्लॅन वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या दराने उपलब्ध आहे :

  • युरोप : सुमारे €२.४९ प्रति महिना (अंदाजे २२० रुपये)

  • अमेरिका : सुमारे $२.९९ प्रति महिना (अंदाजे २५० रुपये)

  • पाकिस्तान : सुमारे २२९ पाकिस्तानी रुपये प्रति महिना (अंदाजे ७० ते ८० रुपये)

  • मेक्सिको : सुमारे २९ MXN प्रति महिना (अंदाजे १४० ते १५० रुपये)

भारतात अजून अधिकृत किंमत जाहीर झालेली नाही, पण लोकल मार्केटनुसार कमी (१०० ते २५० रुपये प्रति महिना असू शकते) असे म्हटले जात आहे. याशिवाय वापरकर्त्यांना एक महिन्याचा फ्री ट्रायल देण्याची शक्यता देखील आहे.

सध्या कोणासाठी उपलब्ध?

‘WhatsApp Plus’ सध्या मर्यादित वापरकर्त्यांसाठी बीटा टेस्टिंग स्वरूपात उपलब्ध आहे. सुरुवातीला हा प्लॅन अँड्रॉइड युजर्ससाठी देण्यात येत असून, पुढील टप्प्यात iOS वरही तो उपलब्ध होणार आहे.

फ्री युजर्ससाठी काय बदल?

महत्त्वाची बाब म्हणजे, हा प्लॅन पूर्णपणे ऐच्छिक आहे. त्यामुळे सध्याचे फ्री फीचर्स कोणत्याही युजरसाठी बंद होणार नाहीत. ‘WhatsApp Plus’ हा फक्त अतिरिक्त आणि कस्टमायझेशनसाठीचा पर्याय असणार आहे.

WhatsApp च्या या नव्या पावलामुळे मेसेजिंग ॲपमध्ये वैयक्तिकरणाचा नवा ट्रेंड सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत उद्या पाणीपुरवठा खंडित; काही भागात कमी दाबाने पाणी

सुभाषचंद्र बोस यांना ‘राष्ट्रपुत्र’ घोषित करा; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Tanvi Kolte : मराठी जिंकलं, आता 'बिग बॉस हिंदी'मध्ये एंट्री? विजेत्या तन्वी कोलतेने दिलं उत्तर; म्हणाली - "ऑफर मिळाली..."

IPL 2026 : गोलंदाजांची आज अग्निपरीक्षा; सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांमध्ये जुगलबंदी

रुग्णांसाठी एकीकृत कार्यपद्धती लागू करावी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश