महाराष्ट्र

कार्तिकी एकादशीनिमित्त १२२ एसटी बसेस; १७ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत अधिक गाड्या

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक पंढरपूरला एसटी, रेल्वे तसेच खासगी वाहनांनी जात असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे आणि एसटीकडून भाविकांच्या प्रवाशाच्या सोयीसाठी अधिक गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Swapnil S

कराड : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक पंढरपूरला एसटी, रेल्वे तसेच खासगी वाहनांनी जात असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे आणि एसटीकडून भाविकांच्या प्रवाशाच्या सोयीसाठी अधिक गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कार्तिकी एकादशी मंगळवारी असून या एकादशीला राज्याच्या विविध भागातून भाविक पंढरपूरला जाणार आहेत. त्यांची ही कार्तिकी वारी सुरळीत पार पडावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने १२२ अधिक गाड्या सोडण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल होणे, सोपे होणार आहे.

यंदा कार्तिकी एकादशीनिमित्ताने विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी त्याला डोळे भरून पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातून हजारो वारकरी दरवर्षी पंढरपूरला जात असतात. यंदा जिल्ह्यात पाऊसही चांगला झालेला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे दिवाळीही उत्साहात पार पडली. ज्यांना आषाढी वारी घडली नाही ते कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जात असतात.

राज्य परिवहन महामंडळाची एसटी हेच एकमेव सोयीचे साधन आहे. येत्या १७ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत अधिक फेऱ्या सोडण्याचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे आणि विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील आगारातील नियोजित गाड्या

सातारा आगार : १५ एसटी बस

कराड आगार : १५ एसटी बस

कोरेगाव आगार : १० एसटी बस

फलटण आगार : १५ एसटी बस

वाई आगार : १५ एसटी बस

पाटण आगार : १० एसटी बस

दहिवडी आगार : १० एसटी बस

महाबळेश्वर आगार : ०५ एसटी बस

मेढा आगार : १० एसटी बस

खंडाळा आगार : ०५ एसटी बस

वडूज आगार : १२ एसटी बस

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी