महाराष्ट्र

माथेरानला जायचंय? आता पर्यटकांसाठी निवासाची मस्त सोय; आरामदायी खिशाला परवडणारे पॉड हॉटेल

Swapnil S

मुंबई : आरामदायी, खिशाला परवडणारे दर, लॉकर रूम, मोबाईल चार्जिंग सुविधा असे सुसज्ज स्लीपिंग पॉड्स (पॉड हॉटेल) लवकरच पर्यटकांसाठी माथेरानमध्ये सुरू करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पॉड हॉटेलला पर्यटकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने माथेरानमध्ये पॉड हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

हिल स्टेशन म्हणून ओळख असलेले माथेरान पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी माथेरानच्या निसर्गरम्य हिल स्टेशनवर पॉड हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या नवीन नाविन्यपूर्ण नॉन फेअर रेव्हेन्यू इन्कम स्कीम (एनआयएनएफआरआयएस) चा एक भाग आहे, माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना अधिक आरामदायी, परवडणारे आणि किफायतशीर निवास पर्याय उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

माथेरान हिल स्टेशन हे मुंबई आणि आसपासच्या रहिवाशांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वाधिक मागणी असलेले पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

ऐतिहासिक नेरळ-माथेरान टॉय ट्रेनद्वारे सेवा दिली जाते. नेरळ-माथेरान टॉय ट्रेनच्या ऑपरेशनच्या शतकाहून अधिक वर्ष साजरे करणारी, नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ही भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वेपैकी एक आहे.

पॉड हॉटेलच्या विकास आणि संचालनाचे कंत्राट ई-लिलावाद्वारे देण्यात आले आहे. यशस्वी बोलीकर्त्याने ८ लाख १९ हजारांच्या वार्षिक रकमेसाठी करार केला. कराराची पहिली तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवाना शुल्कात १० टक्के वार्षिक वाढ करण्यात येणार आहे. तसेच एकूण कराराचा कालावधी १० वर्षांचा आहे. ७५८.७७ चौ.मी.चे उदार एकूण क्षेत्रफळ पसरलेले आहे. माथेरानमधील पर्यटनाचा अनुभव आणखी उंचावला जाईल हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

माथेरान येथील पॉड हॉटेलमध्ये सिंगल पॉड्स, डबल पॉड्स आणि फॅमिली पॉड्स असतील, ज्यामुळे पर्यटकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी निवासाचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. या वातानुकूलित पॉड्स मोबाईल चार्जिंग सुविधा, लॉकर रूम सेवा, फायर अलार्म, इंटरकॉम सिस्टम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम सुविधांसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या जास्तीत जास्त आराम आणि गोपनियता प्रदान करण्यासाठी डिझाइन केले आहे.

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक