वारकऱ्यांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती (Photo- X)
महाराष्ट्र

वारकऱ्यांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

वारकरी भाविकांना आरोग्यसुविधा तत्काळ मिळाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, बाइ क अॅम्बुलन्सचा वापर करण्यात येतो.

Swapnil S

मुंबई : वारकरी भाविकांना आरोग्यसुविधा तत्काळ मिळाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, बाइ क अॅम्बुलन्सचा वापर करण्यात येतो. यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर अॅम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी दिली.

आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. "वारकरी वारीसाठी घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी पोहोचेपर्यंत आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. त्या नियोजनाप्रमाणे सर्व सेवा पुरवाव्यात. वारी कालावधीत भाविकांना डिजिटल आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. 'आरोग्य संपन्न वारी' व 'वारी सहाय्य' या माध्यमातून पालखी मार्गावर वारकरी भाविकांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून, यामध्ये प्रत्येक आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्यामार्फत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे," असेही आबिटकर यांनी सांगितले.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

वारकऱ्यांना मिळणार या आरोग्य सुविधा

  • पालखी मार्गावरील पाणी स्रोतांचे सर्वेक्षण व व निजतुकीकरण. निर्जंतुकीकरण. डेंग्यू, मलेरिया आदी कीटकजन्य आजारांचे सर्वेक्षण तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना. पालखी मार्गावरील हॉटेल, ढाबे व उपाहारगृहांतील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व उपचार.

  • पालखी मार्गावरील खासगी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवांसाठी १० टक्के खाटा राखीव. पालखी मार्गावर ४३ ठिकाणी सुसज्ज आयसीयू सुविधा. पालखी मार्गावर १५६ ठिकाणी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 'मार्फत प्राथमिक उपचार केंद्रे.

  • २१५ आरोग्यदूतांची नियुक्ती.

  • पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागात १६ आयसीयू कक्ष

  • विठ्ठल मंदिर परिसरात २४ बाय ७सुसज्ज आयसीयू कक्ष कार्यरत. पंढरपूर व माळशिरस ग्रामीण भागात अतिरिक्त ५ आयसीयू कक्ष. पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका तैनात.

  • गंभीर रुग्णांसाठी एअर अॅम्बुलन्स सुविधा उपलब्ध.

  • प्रत्येक दिंडी प्रमुखास प्राथमिक उपचार औषध संचाचे वितरण.

  • सेवेसाठी ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती. पंढरपुरात तीन दिवस महाआरोग्य शिबिर

  • पालखी मार्गावरील सर्व आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका व उपचार केंद्रांचे डिजिटल मॅपिंग.

  • महाआरोग्य शिबिरात वारकऱ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप.

    (संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : फुटपाथवर आता कमी उंचीची सावली देणारी झाडे; BMC देणार उद्यान विभागाला धडे

Mumbai : मानखुर्दमध्ये दुर्घटना; सहा जणांचा मृत्यू

कोसळधार! मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज 'ऑरेंज अलर्ट'; शाळा-कॉलेज बंद

पावसाच्या तडाख्याने जनजीवन ठप्प; गावे जलमय, रस्ते बंद, पर्यटनस्थळांवर बंदी

Mumbai : वरळी मेट्रो स्थानकात गळती; ए-२ प्रवेशद्वार दुरुस्तीसाठी दोन दिवस बंद