महाराष्ट्र

अजित पवार अपघातप्रकरणी कर्नाटकात FIR; आमदार रोहित पवार यांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राज्यात एफआयआर दाखल करून घेतला नाही. पण मी कर्नाटक राज्यातील बंगलोरच्या एका पोलीस ठाण्यात जाऊन झीरो एफआयआर दाखल करून घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

Swapnil S

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राज्यात एफआयआर दाखल करून घेतला नाही. पण मी कर्नाटक राज्यातील बंगलोरच्या एका पोलीस ठाण्यात जाऊन झीरो एफआयआर दाखल करून घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. राज्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी यावेळी ज्यांना अजितदादांमुळे सत्ता मिळाली त्यांनी खाल्ल्या मीठाला जागले पाहिजे, असा सणसणीत टोलाही लगावला. विधानसभेत विरोधी पक्षाच्यावतीने आज अंतिम आठवडा मांडण्यात आला. या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर भाष्य केले. या अपघाताबाबत एफआयआर दाखल करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत झाली नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

माझी तक्रार दाखल करून घेतली नाही

एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघातानंतरही राज्यात एफआयआर दाखल होत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मी मरीन ड्राइव्ह, बारामती, सीआयडी अशा ठिकाणी एफआयआर नोंदवण्यासाठी गेलो. मात्र, कुठेही तो दाखल झाला नाही. पण आम्ही कर्नाटकात जाऊन झिरो एफआयआर दाखल केला, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

व्हीएसआर कंपनीच्या मालकाची मनमानी

शरद पवार आणि अजित पवार यांचे नाते वडील-मुलगा असे होते. तरीही अजितदादांनी आमदारांना निधी मिळत नाही, त्यांची कामे होत नाहीत म्हणून शरद पवारांची साथ सोडली. मात्र, ज्यांच्यामुळे तुम्हाला सत्ता मिळाली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना न्याय मिळावा म्हणून कोणीही प्रयत्न करत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. रोहित पवार यांनी यावेळी व्हीएसआर कंपनीवरही आरोप केले. विमान अपघातानंतर राज्य सरकारने त्या कंपनीला ८० कोटी रुपये दिले. या कंपनीचा मालक खुलेआम सांगतो की त्याचे कोणी काही बिघडवू शकत नाही, असेही ते म्हणाले.

मंत्री नसल्याने कामकाज तहकूब

कर्नाटकात दाखल झालेला झिरो एफआयआर महाराष्ट्रात हस्तांतरित झाल्याचे सांगत पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तातडीने तपास सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान, विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू असताना सभागृहात एकच मंत्री उपस्थित होते. विरोधकांनी यावरून गोंधळ केल्याने सभागृहाचे कामकाज १० मिनिटे तहकूब करण्यात आले.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग