मुंबई-पुणे सोडून थेट बहरीन! जय पवार-ऋतुजा पाटील यांचं शाही लग्न; ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी ४०० पाहुण्यांमध्ये NCP चे केवळ २ नेते  
महाराष्ट्र

मुंबई-पुणे सोडून थेट बहरीन! जय पवार-ऋतुजा पाटील यांचं शाही लग्न; ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी ४०० पाहुण्यांमध्ये NCP चे केवळ २ नेते

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा भारतात नव्हे तर थेट मध्य पूर्वेतील बहरीन येथे होणार आहे. उद्या अर्थात ४ डिसेंबर ते ७ डिसेंबर असे चार दिवस हा शाही लग्नसोहळा रंगणार आहे.

Krantee V. Kale

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा भारतात नव्हे तर थेट मध्य पूर्वेतील बहरीन येथे होणार आहे. उद्या अर्थात ४ डिसेंबर ते ७ डिसेंबर असे चार दिवस हा शाही लग्नसोहळा रंगणार आहे. या समारंभासाठी पवार–पाटील कुटुंबीयांनी केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण दिलं असून पाहुण्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केवळ दोन नेत्यांचीच नावे असल्याचे समजते.

जय पवार व ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्याची मागील काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. आता लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यानुसार, ४ ते ७ डिसेंबरदरम्यान मेहंदी, संगीत, हळद असे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. कोणत्या दिवशी कसा पोशाख असावा याचाही उल्लेख लग्नपत्रिकेत आहे. मोजक्याच ४०० निमंत्रितांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून केवळ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनाच आमंत्रण असल्याचे समजते.

कसा आहे कार्यक्रम?

४ डिसेंबरला मेहंदी, ५ डिसेंबरला हळदी, वरात आणि मुख्य लग्नसोहळा, ६ तारखेला संगीत तर ७ डिसेंबरला स्वागत समारंभ होणार आहे.

कोण आहे ऋतुजा पाटील?

ऋतुजा पाटील या साताऱ्यातील फलटण येथील उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. प्रवीण पाटील हे एक यशस्वी उद्योजक असून, ते सोशल मीडिया कंपनी सांभाळतात. ऋतुजा यांच्या कुटुंबाचा व्यवसाय प्रामुख्याने सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग किंवा तत्सम क्षेत्रातील आहे. ऋतुजा उच्चशिक्षित असून, त्यांची व जय पवार यांची गत अनेक वर्षांपासून मैत्री असल्याचे समजते. ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी टूर्सच्या पाटील कुटुंबाच्या सूनबाई आहेत.

बघा फोटो -

जय पवार व ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा १० एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील घोटावडे येथे अजित पवार यांच्या फार्महाऊसवर पार पडला होता. 

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग