महाराष्ट्र

आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली

पोलादपूर तहसिल कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाने गुरूवारी दिवसभरामध्ये ४१ मि.मी. पाऊस पडल्याची तसेच आतापर्यंत ३४२७ मीमी पर्जन्यमान झाल्याची माहिती दिली.

प्रतिनिधी

पोलादपूर : तालुक्यातील पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर राज्यमार्गावरील आंबेनळी घाटामध्ये गुरूवारपासून पावसाने जोर धरल्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा दरडी कोसळायला सुरूवात झाली असून, यावेळी घाटामाथ्यावरील झाडेदेखील दरडीसोबत रस्त्यावर कोसळू लागली असल्याचे दिसून आले आहे.

पोलादपूर तहसिल कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाने गुरूवारी दिवसभरामध्ये ४१ मि.मी. पाऊस पडल्याची तसेच आतापर्यंत ३४२७ मीमी पर्जन्यमान झाल्याची माहिती दिली. यावेळी आंबेनळी घाटातील दरडी हटविण्याचे काम तातडीने पूर्ण झाले असून, घाटमाथ्यावरून कोसळलेल्या झाडांनाही जेसीबीद्वारे रस्त्यावरून हटविण्यात आले असून, रस्ता मोकळा करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार कपिल घोरपडे यांनी दिली. यापूर्वी अनेक दिवस दरडग्रस्त असल्याने बंद असलेल्या आंबेनळी घाटात १५ ऑगस्टच्या सुट्टीच्या तीन दिवसांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे व तेथून पुणे-बंगलोर मार्गावरील वाहतूक वाढल्याने आंबेनळी घाटातील वाहतूक सुरू करण्यात आली होती.

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया