अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO 
महाराष्ट्र

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

अमरावतीच्या परतवाड्यात मुलींच्या शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली.

किशोरी घायवट-उबाळे

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात अल्पवयीन मुलींच्या कथित शोषणप्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज उर्फ तनवीर याच्या घरावर प्रशासनाने बुलडोझर कारवाई केली. अचलपूर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई करत अनधिकृत बांधकामाचा काही भाग पाडला.

अनधिकृत बांधकामावर कारवाई

माहितीनुसार, कारवाईदरम्यान घराच्या बाहेर बांधलेला लोखंडी जिना जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आला. हा जिना घराच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी उभारण्यात आला होता. या अनधिकृत बांधकामाबाबत आधीच नोटीस देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिस बंदोबस्तात कारवाई

कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी भाजप आमदार प्रविण तायडेही घटनास्थळी उपस्थित होते.

गंभीर आरोपांखाली गुन्हा

१९ वर्षीय आरोपी अयाजवर लैंगिक अत्याचार, छळ आणि अश्लील व्हिडिओ बनवण्याचे गंभीर आरोप आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि स्नॅपचॅट ग्रुप्सद्वारे संपर्क साधून तो मुलींना भावनिकरीत्या अडकवून त्यांचे शोषण करत असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई-पुण्यात नेऊन चित्रीकरणाचा आरोप

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अयाज मुलींना मुंबई आणि पुण्याला घेऊन जात असे आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ शूट करत असल्याचा आरोप आहे. असे ३५० हून अधिक व्हिडिओ तयार करून त्यांचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलल्याचाही आरोप आहे.

अनेक आरोपी अटकेत

या प्रकरणात आतापर्यंत अयाजसह त्याचा साथीदार उझेर खान याला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. अयाजला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

डिजिटल तपास सुरू

पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यामधील डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू आहे. या प्रकरणानंतर आरोपीचे काही राजकीय संबंध असल्याची शक्यता व्यक्त होत असून त्याबाबतही तपास सुरू आहे. प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या धक्कादायक प्रकरणामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Delhi Crime : फुटपाथवर झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण; लैंगिक अत्याचारानंतर हत्या, कॅब चालक जेरबंद!

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना