'आप'मधील फुटीने अण्णा हजारे संतप्त; "मर्जीप्रमाणे पक्ष बदलता येऊ नये यासाठी कठोर कायदा गरजेचा" 
महाराष्ट्र

'आप'मधील फुटीने अण्णा हजारे संतप्त; "मर्जीप्रमाणे पक्ष बदलता येऊ नये यासाठी कठोर कायदा गरजेचा"

आपल्या मर्जीप्रमाणे कोणालाही पक्ष बदलता येणार नाही यासाठी पक्ष टिकण्याबाबतचा कायदा करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. आम आदमी पक्षात (आप) फूट पडल्याबद्दल हजारे यांनी संताप व्यक्त करीत नव्या कायद्याची मागणी केली आहे.

Swapnil S

अहिल्यानगर : आपल्या मर्जीप्रमाणे कोणालाही पक्ष बदलता येणार नाही यासाठी पक्ष टिकण्याबाबतचा कायदा करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. आम आदमी पक्षात (आप) फूट पडल्याबद्दल हजारे यांनी संताप व्यक्त करीत नव्या कायद्याची मागणी केली आहे. सत्ता आणि पैसा यांच्या लालचेने नेते इकडून तिकडे जात आहेत, मर्जीप्रमाणे पक्ष बदलत आहेत, त्यामुळे जनतेने चारित्र्यवान लोकांना निवडून दिले पाहिजे, सध्या जे सुरू आहे ते स्वार्थासाठी चालले आहे, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे चालले आहे, आता समाज आणि देश डोळ्यासमोर राहिलेले नाहीत, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

आम आदमी पक्षात (आप) फूट पडल्याबद्दल हजारे यांनी संताप व्यक्त करीत नव्या कायद्याची मागणी केली आहे. सत्ता आणि पैसा यांच्या लालचेने नेते इकडून तिकडे जात आहेत, मर्जीप्रमाणे पक्ष बदलत आहेत, त्यामुळे जनतेने चारित्र्यवान लोकांना निवडून दिले पाहिजे, सध्या जे सुरू आहे ते स्वार्थासाठी चालले आहे, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे चालले आहे, आता समाज आणि देश डोळ्यासमोर राहिलेले नाहीत, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

आपने योग्य मार्ग....

'आप'ने योग्य मार्ग निवडला असता, तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी अहिल्यानगर जिल्ह्यात हजारे यांनी पत्रकारांना सांगितले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. चड्डा आणि इतरांना नक्कीच काहीतरी अडचणी जाणवल्या असतील, म्हणूनच त्यांनी पक्ष'आप'ने योग्य मार्ग निवडला असता, तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी अहिल्यानगर जिल्ह्यात हजारे यांनी पत्रकारांना सांगितले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. चड्डा आणि इतरांना नक्कीच काहीतरी अडचणी जाणवल्या असतील, म्हणूनच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असावा.

नेतृत्वाचा दोष

आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या या निर्णयावर हजारे म्हणाले की, हा सर्वस्वी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाचा दोष आहे. जर पक्षाने योग्य दिशा धरली असती, तर हे लोक सोडून गेले नसते. पक्षात नक्कीच काहीतरी समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असतील. लोकशाहीत कोणासोबत राहायचे आणि कोणाची साथ सोडायची, हे ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. जर पक्ष योग्य मार्गाने चालला असता, तर आज ही वेळ आली नसती, असेही हजारे म्हणाले.

सोयीसाठी व्यवस्था

मुळात राज्यघटनेत पक्ष आणि पार्थ्यांचा उल्लेख नाही. राजकीय मंडळींनी त्यांच्या सोयीसाठी ही व्यवस्था उभी केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आम आदमी पार्टीची स्थापना आंदोलनातून झाली होती. आता ज्या खासदारांनी पक्षांतराचा निर्णय घेतला त्यांना त्या पक्षात काही तरी अडचण, काही तरी चुकीचे वाटत असेल. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असेही हजारे म्हणाले.

२०१२ मध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातूनच आम आदमी पार्टीचा उदय झाला होता. मात्र, राघव चड्डा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोठ्या बंडामुळे केजरीवाल यांच्या पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

एसटी प्रवाशांचे होणार विमानासारखे स्वागत; घटती प्रवासी संख्या रोखण्यासाठी परिवहन महामंडळाची राज्यव्यापी मोहीम

यंदाही पाऊस लवकर; २५ मेपर्यंत केरळात येणे शक्य, नैऋत्य वारे सक्रीय

खंडाळ्याच्या घाटातून होणार झपाझप प्रवास; मिसिंग लिंकचे उद्घाटन ठरल्यानुसार १ मे रोजी

Mumbai : बहाव्याच्या बहरानेही दिले पावसाचे शुभसंकेत; दादर येथील प्रमोद महाजन कला पार्कात बहावा बहरला

ड्रग्ज माफिया सलीम डोला तुर्कियेमध्ये ताब्यात; दाऊद इब्राहिमला मोठा धक्का; अमली पदार्थांच्या जाळ्याचा पर्दाफाश होणार