भोंदू खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; खरातच्या फरार पत्नीचा शोध सुरूच 
महाराष्ट्र

भोंदू खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; खरातच्या फरार पत्नीचा शोध सुरूच

राज्यभरात खळबळ उडवून दिलेला नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात हा गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत होता.

Swapnil S

नाशिक : राज्यभरात खळबळ उडवून दिलेला नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात हा गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत होता. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपल्याने त्याला नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि चर्चा पाहता, मोठ्या पोलिस बंदोबस्तात खरातला न्यायालयात आणण्यात आले आणि अवघ्या पाच मिनिटांत सुनावणी होऊन त्याला कोर्टाबाहेर नेण्यात आले.

दुसऱ्या सुनावणीसाठी आजही कोर्टात आणणार

न्यायाधीश श्रीमती बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात अशोक खरातला हजर करण्यात आले. तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी हे कोर्टरूममध्ये दाखल झाले. सरकारी वकील शैलेंद्र बागडेही हजर झाले.आधी सरकारी वकीलांच्या युक्तीवादाला सुरूवात झाली. न्यायाधीशांनी काही कागदपत्रे तपासली आणि तपास अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ही शिक्षा पहिल्या गुन्ह्यासाठी देण्यात आली. आता उद्या पुन्हा त्याला दुसऱ्या गुन्ह्या संदर्भातील सुनावणीसाठी कोर्टात हजर केले जाणार आहे.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन