भोंदू अशोक खरात प्रकरण : खरातच्या कोठडीत ९ मेपर्यंत वाढ (संग्रहित फोटो)
महाराष्ट्र

भोंदू अशोक खरात प्रकरण : खरातच्या कोठडीत ९ मेपर्यंत वाढ

नाशिकमधील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी भोंदू अशोक खरात याला कडक पोलीस बंदोबस्तात मंगळवारी राहाता सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

Swapnil S

नाशिक : नाशिकमधील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी भोंदू अशोक खरात याला कडक पोलीस बंदोबस्तात मंगळवारी राहाता सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. जमीन खरेदी आणि अवैध सावकारीप्रकरणी शिर्डी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, सुरक्षेच्या कारणास्तव आरसीपी तुकडीसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

या प्रकरणातील गुंतागुंत पाहता, आरोपीने केलेल्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. तसेच अशोक खरातच्या पोलिस कोठडीत वाढ झाली असून त्याला शनिवार ९ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

सुनावणी दरम्यान सरकारी वकील ॲड. गौरव बोर्डे यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपीने जमीन खरेदीसाठी लागणारी कोट्यवधींची रक्कम नेमकी कुठून आणली आणि हे व्यवहार कोणाच्या मदतीने केले, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा