महाराष्ट्र

Baramati By-Election: बारामतीत काँग्रेस उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू; सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन

बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी स्वतः उमेदवारांशी संपर्क सुरू केला आहे.

Swapnil S

मुंबई : बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी स्वतः उमेदवारांशी संपर्क सुरू केला आहे. बुधवारी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून काँग्रेसचा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. त्यावर सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्याची विनंती केल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी आज सपकाळ यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची त्यांना विनंती केली. त्यावेळी सपकाळ यांनी त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची विनंती केल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराबाबतचा अंतिम निर्णय आता दिल्ली दरबारी होणार आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी एकूण ५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत २ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आता ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवारी संपत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी छोट्या-मोठ्या पक्षाचे उमेदवार तसेच अपक्ष यांच्याशी संपर्क साधून त्यांना माघारीसाठी गळ घातली जात आहे.

सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. जवळपास एक तास चाललेल्या बैठकीत बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पावसाचे धूमशान! ठाणे-पालघर पट्ट्यात मुसळधार; मुंबईत आजही रेड अलर्ट, रेल्वे उशिराने, उपनगरातील रस्ते पाण्याखाली

आजचे राशिभविष्य, ५ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Sunday Special Recipe : जेवणाची मजा होईल दुप्पट; बनवा मसालेदार प्रॉन टिक्का मसाला

Kitchen Tips : पावसाळ्यात स्वयंपाकघरातील सामान खराब होण्याची चिंता? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन